शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पोटच्या दोन मुलांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून 'त्यांनी' दत्तक घेतली 11 गरीब मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 06:23 IST

आपल्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेतील भटक्या व गरीब कुटुंबांतील ११ मुले दत्तक घेतली

लासुर्णे : लासुर्णे येथील पाटीलवस्ती जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दिलीप बापूराव काळे यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेतील भटक्या व गरीब कुटुंबांतील ११ मुले दत्तक घेतली आहेत. काळे यांनी या मुलांना वर्षभर लागणारे सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य ते देणार आहेत. आज त्यांनी दोन्ही मुलांचा वाढदिवसाचा खर्च टाळून या मुलांना शैक्षणिक साहित्य, गणवेश वाटप केले. तसेच शाळेतील सर्व मुलांना गोड खाऊचे वाटप केले. त्यांच्या दोन्ही मुलांचे वाढदिवस सप्टेंबर महिन्यात येतात.काळे यांचा मोठा मुलगा अमित यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिला व देशात नववा आला होता. सध्या त्यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावरून कॅप्टनपदावर पदोन्नती झाली आहे. तर दुसरा मुलगा अक्षय स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. पाटीलवस्ती शाळेत सर्व गोरगरीब कुटुंबातीलमुले शिकत आहेत. शैक्षणिक साहित्याअभावी त्यांची हेळसांड होत होती. परंतु, आता ही मुले आवडीने शाळेत येत आहेत.यापूर्वीही काळे यांनी टकलेवस्ती (लासुर्णे) येथील वैदू या भटक्या समाजातील मुलांची भटकंती थांबवून उल्लेखनीय शैक्षणिक कार्य केल्याने महाराष्ट्र शासनाने त्यांची दखल घेवून त्यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव केला आहे. काळे यांनी नंदिनी राठोड, राज राठोड, अक्षय गायकवाड, आयुष काळे, सोनाली मोहिते, यश काळे, सुयश काळे, अनिषा काळे, अंजली मेहिते व रूकसाना शेख या मुलांना दत्तक घेतले आहे.

टॅग्स :Puneपुणे