शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Pooja Khedkar Case Updates : IAS पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट..! पालकांच्या संपत्तीचा होणार खुलासा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 15:05 IST

अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचे नोंदणी महानिरीक्षकांना पत्र

पुणे : नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करून आयएएस पदाचा लाभ मिळविणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडील आणि आईच्या नावावरील मालमत्तांची माहिती द्यावी, अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांकडे केली आहे. त्यातून दोघांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची एकत्रित माहिती गोळा करून प्रशासनाची समिती उत्पन्नाची मर्यादा ठरविणार आहे. खेडकर यांच्या मालमत्तांची चौकशी हा प्राप्तिकर विभागाच्या चौकशीचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचे उत्पन्न कोटींमध्ये असतानाही त्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले, असा सवाल उपस्थित झाल्यानंतर ही चौकशी सुरू झाली आहे. पूजा खेडकर यांनी पुण्यातील काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून एनटी ३ या संवर्गातून प्रवेश मिळवला होता. त्यावेळी त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रही जोडल्याचे स्पष्ट झाले होते. वास्तविक, दिलीप खेडकर हे त्यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी होते. त्यामुळे २००७ मध्ये त्यांचे उत्पन्न ४ लाखांपेक्षा कमी कसे असेल, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता.पूजा खेडकर यांनी २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ओबीसी संवर्गातून तसेच दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून आयएएसची श्रेणी मिळवली होती. त्यासाठी त्यांनी पुन्हा नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडले होते. त्यानंतर एका वर्षातच अर्थात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप खेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ४० कोटी रुपये संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पूजा यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले, असा प्रश्न पुन्हा उपस्थित करण्यात आला. त्यानुसार दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्या नावावरील मालमत्तांची एकत्रित माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे पत्र अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांना दिले आहे. येत्या काही दिवसांत याची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाला प्राथमिक तपासात खेडकर यांचे उत्पन्न नॉन क्रिमिलेअरच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे सकृत्दर्शनी दिसून आले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी उत्पन्नातून किती मालमत्ता खरेदी केल्या, याचीही मोजणी करून एकूण उत्पन्न काढण्यात येणार आहे. यातून त्यांच्या उत्पन्नाची वार्षिक मर्यादा ठरविण्यात येणार आहे. ही मर्यादा ठरविण्यासाठी विभागीय स्तरावरील व जिल्हा स्तरावरील समिती अभ्यास करणार आहे. जिल्हा स्तरावरील समिती खेडकर हे उन्नत व प्रगत गटात मोडतात किंवा नाही याची खात्री करून आपला अहवाल विभागीय समितीकडे पाठविणार आहे. त्यानंतर खेडकर यांचे नॉन क्रिमिलेअर हे वैध होते किंवा नाही, याची पडताळणी विभागीय समिती करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड