शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

आंबडखिंडीत दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 23:28 IST

भोर-मांढरदेवी मार्गावरील आंबडखिंड (ता. भोर) घाटात रविवारी सकाळी ५.३० च्या दरम्यान कणीची ओहळ येथे मोठी दरड कोसळल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

नेरे : भोर-मांढरदेवी मार्गावरील आंबडखिंड (ता. भोर) घाटात रविवारी सकाळी ५.३० च्या दरम्यान कणीची ओहळ येथे मोठी दरड कोसळल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. भोर-मांढरदेवी मार्गावरून आंबड खिंड घाटातून वाई, महाबळेश्वर, पाचगणीला जाणाºया पर्यटकांची मोठी संख्या आहे.या घाटात रविवारी सकाळी साडेपाचच्या दरम्यान आंबाडे येथील ट्रेकिंगला जाणा-या तरुणांना मोठा आवाज आला. या तरुणांनी घाटातून फेरफटका मारून पाहिले असता त्यांना दरड कोसळल्याचे दिसले. त्यांनी प्रसंगावधान राखत घाटातून प्रवास करणा-या वाहनांना थांबवून या घटनेची माहिती दिली. तसेच, कोसळलेल्या दगडींच्या ढिगा-याखाली कोणी सापडून अपघात झाला आहे काय, याचीही त्यांनी पाहणी केली. याच तरुणांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला घटनेची त्वरित माहिती दिली.>तीन किलोमीटर पायी प्रवासएका तासानंतर भोर-मांढरदेवी एसटी बसचे चालक विजय खोपडे, वाहक दयानंद बोगाळे, मनोज खोपडे आणि मुंबई येथील पुरुष प्रवाशांनी जीव धोक्यात घालून कोसळलेल्या दरडी काही वेळातच बाजूला करून दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू केली. एसटी बस घाटात अडकल्याने प्रवाशांना मात्र तीन किलोमीटर पायी प्रवास करावा लागला. दोन तासांनंतर साप्ताहिक सुट्टी असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी बाळू भेलके, शरद रांजणे जेसीबी घेऊन घटनास्थळी पोहोचून रस्त्यावरील राडारोडा बाजूला करून मार्ग मोकळा केला.