शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुंभकरांना प्रदूषणाचा त्रास, ग्रामीण भागातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 03:20 IST

नुकत्याच दिल्लीत झालेल्या प्रदूषणाच्या प्रश्नावर सर्वत्र गोंधळ माजला आहे. देशाची राजधानी व मोठ्या राजकीय उलाढालीचे शहर म्हणून कदाचित दिल्लीतील प्रदूषणावर उच्चस्तरीय उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न झाला.

कुरकुंभ : नुकत्याच दिल्लीत झालेल्या प्रदूषणाच्या प्रश्नावर सर्वत्र गोंधळ माजला आहे. देशाची राजधानी व मोठ्या राजकीय उलाढालीचे शहर म्हणून कदाचित दिल्लीतील प्रदूषणावर उच्चस्तरीय उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न झाला. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात वाढत्या लोकसंख्येने या प्रदूषणाच्या प्रश्नावर आणखीनच गंभीर स्वरूप धारण केले आहे. दिल्लीत पसरणारे धूर व धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. याचाच परिणाम म्हणून अगदी शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या.याच्या विपरीत परिस्थिती ग्रामीण भागात दिसते. कुरकुंभ (ता. दौंड) येथे असणारा रासायनिक प्रकल्प व त्यातून होणारे जीवघेणे प्रदूषण याबाबत जणू सामान्य माणसाचे जीवन धोक्यात घालण्याचे प्रमाणपत्र मिळाले असल्याच्या दिमाखात येथील कारखानदार व त्यांचे अधिकारी वावरत आहेत.तीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून येथील नागरिक रासायनिक प्रदूषणाच्या समस्येपासून त्रस्त आहेत. विविध आजार व व्याधी अंगावर घेऊन जीवन व्यतित करीत असताना याकडे राजकीय व प्रशासकीय दुर्लक्ष कसे जाणूनबुजून करण्यात आले याचा प्रत्यय सध्या कुरकुंभ येथील नागरिक घेत आहेत.केंद्र सरकार एकीकडे नद्या स्वच्छ करण्यासाठी करोडो रुपये खर्च करून मोठ्या स्वरूपाचे देशपातळीवर योजना-आराखडे तयार करत असून, यावर वेगळ्या मंत्रालयामार्फत काम केले जात आहे. मात्र औद्योगिक मंत्रालयाला लागलेली कुंभकर्णी झोप काही केल्या उडत नाही याचे जिवंत उदाहरण म्हणजे कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्प. गेल्या तीस वर्षांत एकाही उद्योग मंत्र्याने किंवा त्याच्या संबंधातील कुठल्याही उच्चस्तरीय अधिकाºयाने याची दखल घेतलेली नाही.ग्रामस्थांच्या या लढ्यातून संघर्ष करता करता दुसºया पिढीकडे याचे नेतृत्व आले. मात्र कदाचित याला आता उशीर झाला आहे. कुरकुंभ येथील नैसर्गिक पाण्याचा स्रोत हा कायमचा खराब झाला आहे. कुरकुंभ येथील लोकसंख्या आता पाण्यासाठी परावलंबी झालेली आहे. कुरकुंभ औद्योगिक विकास मंडळाकडून होणाºया पाणीपुरवठ्यावर निर्भर राहावे लागत असून, जवळ असणाºया पाण्याचा वापर करणे शक्य नसल्याचे वास्तव चित्र कुरकुंभ व परिसरात पाहावयास मिळते.सामाजिक चळवळ उभी व्हावीपाण्याच्या प्रदूषित होण्याबरोबरच हवेतील प्रदूषणदेखील मोठे आवाहन बनून समोर उभे ठाकत आहे. मोठ्या स्वरूपात होणाºया रासायनिक अभिक्रिया व त्यासाठी विविध रसायनांचा होत असणारा अतिरेक वापर यातून मोठ्या प्रमाणात हवा दूषित होत आहे. मात्र, याचा दुरुपयोग प्रत्यक्ष कुरकुंभ येथील नागरिक व चतुर्थ श्रेणीत काम करणाºया कामगारांना होत आहे.एकंदरीतच काय, तर शहरी व ग्रामीण भागात होणाºया कारवायांमध्ये किती मोठ्या प्रमाणात फरक असतो हे दिसून येते. त्यामुळे यासाठी लागणारे राजकीय नेतृत्व खंबीर असण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक चळवळ उभी करणेदेखील आवश्यक आहे.

टॅग्स :Puneपुणे