शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींसाठी मतदान शांततेत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 02:56 IST

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांची नाळ जोडली गेली असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे सोमवारी (दि. २८) असणाºया निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुपे   - बारामती तालुक्यातील सुपे, दंडवाडी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, चांदगुडेवाडी आणि कुतवळवाडी आदी ग्रामपंचायतींचे मतदान रविवारी (दि. २७) शांततेत पार पडले. आहे. या निवडणुकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांची नाळ जोडली गेली असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे सोमवारी (दि. २८) असणाºया निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सुपे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी तिरंगी लढत झाली. त्यामुळे संपुर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. येथील दोन्ही आजी माजी पदाधिकाºयांनी ही लढत प्रतिष्ठेची केली असल्याने कोण बाजी मारणार या कडे लक्ष लागले आहे. येथील सरपंचपदासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. के. हिरवे यांच्या सूनबाई कावेरी हिरवे, बाजार समितीचे संचालक शौकत कोतवाल यांच्या भावजय अंजुम कोतवाल तर तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अनिल हिरवे यांच्या पत्नी स्वाती हिरवे यांच्यात तिरंगी लढत झाल्याने तालुक्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. तसेच माजी सरपंच व विद्यमान सदस्य शौकत कोतवाल, उपसरपंच शफिक बागवान, सदस्या मीरा तेली आणि सुनिता चव्हाण आदी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.दंडवाडीच्या सरपंचपदी मनीषा चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर इतर मागासवर्गीय दोन जागांचे अर्ज बाद झाल्याने येथे सात जागांसाठी चौदा उमेदवार रिंगणात आहे. येथील पॅनलप्रमुखांनी नविन चेहºयांना संधी दिली आहे. मात्र बारामती तालुका बाजार समितीचे माजी सभापती संपतराव जगताप यांच्या भावजय इंदुताई जगताप तर शिवसेना तालुका उपप्रमुख नामदेव चांदगुडे यांच्या पत्नी मनीषा चांदगुडे यांच्यात सरळ लढत झाल्याने कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.कुतवळवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग एक मधुन शिवाजी माने, सारिका बोरकर, दत्तात्रय कदम अशा तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर येथील सरपंचपद अनुसुचित जातीसाठी आरक्षित असल्याने येथे तिरंगी लढत होत आहे. तसेच सदस्यपदाच्या सहा जागांसाठी चौदा उमेदवार रिंगणात उभे आहेत. यामध्ये बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष दत्तात्रय कुतवळ हे विद्यमान ग्रा. पं. सदस्य असुनही पुन्हा रिंगणात उतरले आहे. त्यांच्या या प्रभागामध्ये तिरंगी लढत झाल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.दंडवाडीत सर्वाधिक ९१.६४ टक्के सुपे : सुप्यासह परिसरातील सहा ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकुन मतदान केंद्रापैकी दंडवाडीतील तीन मतदान केंद्रात मिळुन सर्वाधिक ९१.६४ टक्के मतदानाची नोंद झाली. पानसरेवाडी वगळता सर्वत्र एकुण मतदान शांततेत झाले.पानसरेवाडीत प्रभाग क्रमांक ३ मधील उमेदवार रेश्मा धायगुडे यांचे चिन्ह बदल झाल्याने गोधळाचे वातावरण झाले होते. मात्र त्यानंतर शांततेत मतदान झाले. सुपे येथील पाच मतदान केंद्रावर एकुन ३९४७ मतदारांपैकी ३२१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे येथे ८१.४५ टक्के मतदारांनी मतदान केले तर येथील एकुण पाच प्रभागापैकी प्रभाग क्रमांक ४ मध्ये सर्वाधिक ८२. ९३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी अंकुश खांडेकर यांनी दिली. दंडवाडीतील प्रभाग १ मध्ये ९४. ८४ टक्के, प्रभाग २ मध्ये ९४. ८८ टक्के तर प्रभाग ३ मध्ये ८५. ३७ टक्के मतदान झाले. कुतवळवाडीत प्रभाग १ मध्ये ९२. ५६ टक्के, प्रभाग २ मध्ये ८७.८७ टक्के तर प्रभाग ३ मध्ये ९३.४० टक्के मतदानाची नोंद झाली. चांदगुडेवाडीत तीन प्रभागत मिळुन ८८.४५ टक्के मतदान झाले. काळखैरेवाडीत प्रभाग १ मध्ये ९४.११ टक्के, प्रभाग २ मध्ये ८८ टक्के तर प्रभाग ३ मध्ये ८७. ९४ टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती यु. एम. कदम यांनी दिली. तर पानसरेवाडीत प्रभाग १ मध्ये ८७ टक्के, प्रभाग २ मध्ये ९१. ९० टक्के तर प्रभाग ३ मध्ये ८९ टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी एस. एस. गायकवाड यांनी दिली.आंबेगावात ८१.६० टक्के मतदानघोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींसाठी ८१.६० टक्के मतदान झाले. सर्व ग्रामपंचायती मिळून ८८ जागा होत्या. पैकी ३१ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत, तर उर्वरीत ५७ जागांसाठी ११२ उमेदवार उभे राहिले आहेत.टाव्हरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये ९३.५६ टक्के मतदान झाले, फुलवडे ग्रामपंचायतमध्ये ७५.५४ टक्के मतदान झाले, लोणी ग्रामपंचायतमध्ये ८४.४२ टक्के मतदान झाले, कानसे ग्रामपंचायतमध्ये म्हणजेच ७८.१५ टक्के मतदान झाले, चपटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये ८५.४१ टक्के मतदान झाले, ताबंडेमाळा ग्रामपंचायतीमध्ये ९४.०७ टक्के मतदान झाले, पारगाव तर्फे अवसरी बुद्रूक ग्रामपंचायतीमध्ये ८२.०६ टक्के मतदान झाले, अवसरी बुद्रूक ग्रामपंचायतीमध्ये ७७.७२ टक्के मतदान झाले, सुपेधर ग्रामपंचायतमध्ये ७३.३५ टक्के मतदान झाले, एकुण ९ ग्रामपंचायतींचे १४१५० मतदान होते पैकी११५४७ म्हणजेच ८१.६० टक्के मतदान झाले.खडकवाडी ग्रामपंचायतीसाठी ८७.९१ टक्के मतदान झाले. उद्या (दि. २८) सकाळी १० वाजता तहसील कार्यालय घोडेगाव येथे मतमोजणी होणार आहे.अवसरी खुर्द :  ग्रामपंचायत निवडणुकीत ८0 टक्के मतदान  अवसरी बुदु्रक (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान ८0 टक्क्यांपेक्षा जास्त झाले असून, मतदान शांततेत पार पडले आहे. मतदारांनी मतदानासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या.राष्ट्रवादी काँगे्रस व शिवसेनेच्या वतीने मतदारांना ने-आण करण्यासाठी चारचाकी वाहनांची सोय केली होती. तरूण मतदारांमध्ये मोठा उत्साह जाणवत होता. सरपंच आपल्या पक्षाचा व्हावा म्हणून राष्ट्रवादीच्या व शिवसेनेच्या वतीने ताकत लावण्यात आली. अवसरी बुदु्रक गावचे मतदान ३६00 पेक्षा जास्त आहे.१३ ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या तीन सदस्यांची बिनविरोध प्रक्रिया पार पडली.सकाळी ९ वाजल्यापासून पाचही वॉर्डात मतदान करण्यासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मंचर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक बंडोपंत घाटगे व त्यांच्या सहकाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.जुन्नर येथे मतदानाला चांगला प्रतिसाद बेल्हा : बेल्हा (ता. जुन्नर) येथे ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. येथे एकूण ७९.८५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी के. डी. भुजबळ यांनी दिली.एकूण सहा मतदान केंद्र असून, अगदी सकाळपासूनच सर्वच केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. मतदान संथगतीने होत असल्यामुळे सर्वच केंद्रांवर रांगा दिसून येत होत्या. सकाळी दहानंतर मतदानाचा वेग वाढला होता. कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी येण्यासाठी घरोघरी जाऊन आवाहन करीत होते. बाहेरून येणाºया मतदानावरती लक्ष ठेवले जात होते. मतदारांना त्यांचा मतदान यादीवरचा नंबर अगोदरच दिलेला होता. संध्याकाळपर्यंत बूथवर कार्यकर्ते बसून होते. येथे एकूण ६७३२ मतदानापैकी ५३३२ मतदान झाले. एकूण ७९.८५ टक्के मतदान झाले, तर तांबेवाडी येथील ग्रामपंचायतीसाठी ४८३ मतदारांपैकी ४५० एवढे मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी के.बी.खोडदे यांनी दिली. येथे ९३.१६ टक्के एवढे मतदान झाले, तर गुंजाळवाडी येथील ग्रामपंचायतीसाठी एकूण १४५० मतदानापैकी १३५० एवढे मतदान झाले. तेथे ९३.१० टक्के मतदान झाले आहे.नवीन यादीत सामाविष्ट झालेले मतदार मतदान करण्यासाठी जास्त उत्सुक होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPuneपुणे