शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पगडीखाली सुरू झाले राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 03:20 IST

निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना जात आठवते, असा आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फक्त फुले पगडी घातली जाईल, अशी घोषणा रविवारी केली होती.

पुणे - निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना जात आठवते, असा आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फक्त फुले पगडी घातली जाईल, अशी घोषणा रविवारी केली होती. छगन भुजबळ यांचा सुरुवातीलापुणेरी पगडी घालून सत्कार करण्यात आला होता; मात्र पवारांनी नेत्यांकरवी फुले पगडी आणण्याचे आदेश दिले. सहकारनगर परिसरातून थेट लक्ष्मी रस्त्यावर कार्यकर्त्यांना पाठविण्यात आले. शरद पवार यांचे भाषण सुरू झाल्यावर हा कार्यकर्ता पोहोचला. पवार यांनी पुणे शहराध्यक्ष वंदना चव्हाण आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना बोलावून घेऊन फुले पगडी घालायला लावली.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानेही शरद पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. पुणेरी पगडी ही काही कोणत्याही जातीची, समाजाची किंवा धर्माची मक्तेदारी नाही. ती पुण्याची ओळख आहे. जी पगडी घालून शिवाजीमहाराजांच्या सेनापतीने म्हणजेच, पेशव्यांनी अटकेपार झेंडा लावला आणि महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न साकार केले नव्हे, त्याचे साम्राज्यात रूपांतर केले. त्या पगडीला नाकारून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पुण्याचा अपमान केला आहे. त्यांनी पुणे शहराची माफी मागावी आणि मनाचा मोठेपणा दाखवून द्यावा, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे.भारताचे सर्व पंतप्रधान, राष्ट्रपती, मोठे चेहरे जेव्हा पुण्यात आले, त्यांनी ही पगडी डोक्यावर ठेवणे अभिमान समजला. खुद्द शरद पवार यांनी कित्येकवेळा ही पगडी घातली आहे. मग आताच त्यांना असे काय झाले, असा सवाल दवे यांनी उपस्थित केला आहे.महात्मा फुले यांच्याविषयी आम्हाला खरंच आदर आहे म्हणून आम्ही त्यांना राजकीय सोय न समजता वंदन करतो. पवारांनी अतिशय हीन राजकारण करीत पुन्हा एकदा स्वत:चे जातीय विषारी स्वरूप दाखवून दिले आहे, असे दवे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकPoliticsराजकारण