शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

शेतकरी संपाबाबत राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी : राष्ट्रीय किसान महासंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 1:35 PM

काही राजकीय पक्ष देशव्यापी शेतकरी संपाचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आधी संपाबाबत भूमिका स्पष्ट करावी, जेणेकरून त्यांचे शेतकरी प्रेम किती बेगडी आहे, हे दिसून येईल.

ठळक मुद्दे देशभरातील १३० शेतकरी संघटना संपामध्ये सहभागी परप्रांतियांविरोधात गळा काढणाऱ्या नेत्यांनी या प्रश्नावरही बोलावेशासनाने शेतकरी प्रश्नावर तातडीने मार्ग न काढल्यास खळखट्याकचा मार्ग

पुणे : राष्ट्रीय किसान महासंघाचे देशव्यापी शेतकरी संप पूर्णपणे अराजकीय आहे. शेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल तर काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांनी शेतकरी संपाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन महासंघाने केले आहे. तसेच शासनाने शेतकरी प्रश्नावर तातडीने मार्ग न काढल्यास खळखट्याकचा मार्ग स्वीकाराला लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. महासंघाच्या राष्ट्रीय कोअर कमिचीचे सदस्य संदीप गिड्डे-पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन संपाच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. यावेळी कृती समितीचे सल्लागार श्रीकांत मराळ, लक्ष्मण वंगे व राज्य समन्वयक शंकर दरेकर उपस्थित होते. गिड्डे-पाटील म्हणाले, देशभरातील १३० शेतकरी संघटना संपामध्ये सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, छत्तीसगढ व उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दि. ६ जून रोजी मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आयोजित केलेल्या सभेशी महासंघाचा संबंध नाही़. काही राजकीय पक्ष संपाचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांनी आधी संपाबाबत भूमिका स्पष्ट करावी, जेणेकरून त्यांचे शेतकरी प्रेम किती बेगडी आहे, हे दिसून येईल. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यातून दुध येते. हे दुध बंद झाल्यास राज्यातील दुधाला चांगला भाव मिळेल. परप्रांतियांविरोधात गळा काढणाऱ्या नेत्यांनी या प्रश्नावरही बोलावे, अशी टीका गिड्डे-पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली. शेतकरी संपाबाबत शासनाची भूमिका असंवेदनशील दिसत आहे. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने संप सुरू असल्याने शासनाने शेतकऱ्यांना गृहित धरू नये. पुणे, नाशिक, मुंबई या शहरांमध्ये दुध व भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण करण्यास संपामुळे यश आले आहे. पुढील काळात त्याची तीव्रता अधिक वाढविली जाईल. या प्रश्नावर तातडीने तोडगा न काढल्याने शेतकरी रस्त्यावर उतरतील. येत्या ६ जून रोजी देशभरात सरकारचा निषेध करण्यासाठी श्रध्दांजली सभा घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर दि. १० जून रोजी भारत आंदोलनाची तयारी सुरू असून शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे गिड्डे-पाटील यांनी सांगितले.----------व्यासपीठ मिळत नसल्याने विरोधकाही शेतकरी संघटनांनी मागील वर्षीच्या आंदोलनात त्यांची विश्वासार्हता घालविली आहे. सध्या सुरू असलेल्या संपामध्ये त्यांना नेतृत्वाची संधी, व्यासपीठ मिळत नाही. त्यामुळे गैरसमज पसरविले जात आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. त्यामुळे ते या आंदोलनाला विरोध करत असल्याची टीका महासंघाच्या वतीने राजु शेट्टी, रघुनाथ पाटील व अनिल घनवट यांच्यावर करण्यात आली. त्यांनी विरोध केला तरी शेतकरी त्यांचा निषेध करून संपात सहभागी होत असल्याचे गिड्डे-पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेFarmer strikeशेतकरी संपGovernmentसरकारPoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरी