शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातर्फे १२,९०७ बालकांना पोलिओ लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 13:27 IST

पल्स पोलिओ मोहिमेचा पहिला टप्पा पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातर्फे १२,९०७ बालकांना डोस पाजण्यात आला. मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व लहान मुलांना पोलिओ डोस देण्याचे आले.

ठळक मुद्देढोले पाटील सहायक आयुक्त कार्यालयांतर्गत करण्यात आले होते एकूण ७८ बुथरेल्वे स्टेशन, एसटी स्टॅँड, बसस्टॉप अशा वर्दळीच्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन दिले गेले डोस

पुणे : पल्स पोलिओ मोहिमेचा पहिला टप्पा पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातर्फे १२,९०७ बालकांना डोस पाजण्यात आला.या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व लहान मुलांना पोलिओ डोस देण्याचे आले. याकरिता ढोले पाटील सहायक आयुक्त कार्यालयांतर्गत एकूण ७८ बुथ करण्यात आले होते. तसेच ट्रान्झिट व मोबाईल टीमही पोलिओ डोस देण्याकरिता तयार करण्यात आल्या होत्या. या मोहिमेत विशेषत: रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅँड, बसस्टॉप अशा वर्दळीच्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन लहान बालकांना पोलिओ डोस दिले गेले. याचप्रमाणे सिग्नलच्या ठिकाणी असणारी लहान मुले तसेच वाड्यावस्ती, बांधकाम ठिकाणे येथील बालकांनाही विशेष प्रयत्न करून पोलिओ डोस देण्याचे काम करण्यात आले.या मोहिमेत पुणे महानगरपालिकेची विविध रुग्णालये, कवडे पाटील दवाखाना, कोरेगाव पार्क, दादासाहेब गायकवाड दवाखाना, बारणे रोड, नायडू सांसर्गिक रुग्णालय, सखाराम कुंडलिक कोद्रे दवाखाना मुंढवा याचप्रमाणे ससून सर्वोपचार रुग्णालय व के. ई.एम. हॉस्पिटल येथेही पोलिओ बूथ ठेवण्यात आले होते. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा सुलाखे, डॉ. स्वाती माळी, डॉ. सुप्रिया बिरादार, डॉ. पूनम कदम यांनी महत्त्वाचे योगदान दिले. रविवारी पार पडलेल्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी स्वरुपवर्धिनी कॉलेज, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे नर्सिंग विद्यार्थी, रोटरी क्लब आॅफ एअरपोर्टच्या सदस्या आरती संघवी यांनी स्वयंसेवकांना फुड्स पॅकेट देण्यात आले व के. ई. एम. रुग्णालय, अंगणवाडी सेविका यांनी विशेष सहकार्य केले. पुणे पालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे, लसीकरण अधिकारी डॉ. आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश जगदाळे व सहकारी टीम, शैलेश चव्हाण,  कृष्णा कसबे यांनी ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे