शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चौकीतच पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 04:07 IST

मार्केट यार्ड येथील रस्त्यावर रात्री पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्याच्या घटनेनंतर सोमवारी थेट पोलीस चौकीत पोलीस नाईकास मारहाण करण्याची घटना घडली.

पुणे : मार्केट यार्ड येथील रस्त्यावर रात्री पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्याच्या घटनेनंतर सोमवारी थेट पोलीस चौकीत पोलीस नाईकास मारहाण करण्याची घटना घडली़ रस्त्यावर आरडाओरडा करणाºया चौघांना पोलीस चौकीत आणल्याने त्याचा राग येऊन एकाने पोलीस कर्मचाºयाला केलेल्या मारहाणीत त्यांचा हात फ्रॅक्चर झाला़ याप्रकरणी खडक पोलिसांनी सुरेश डंबर आहुजी (वय ४१, रा़ भवानी पेठ) याला अटक केली आहे़याप्रकरणी एस. एन. लोहोमकर यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना मीठगंज पोलीस चौकीत सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली़याबाबत पोलिसांनी सांगितले, की गंजपेठ पोलीस चौकीसमोरील एका वाईन्स दुकानाबाहेर चौघे जण आरडाओरडा करीत होते़ त्या वेळी पोलीस चौकीत अमलदार असलेल्या एस़ एऩ लोहोमकर यांनी बाहेर येऊन आरडाओरडा करू नका, असे सांगून चौघांना पोलीस चौकीत आणले़ त्यांच्याकडे चौकशी करीत असतानाच सुरेश आहुजी तेथे आला़ त्याने माझ्या माणसांना का पोलीस चौकीत आणले, असे म्हणून त्यांच्याशी हुज्जत घालू लागला आणि लोहोमकर यांचा हात पिरगळून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली़ त्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला़ खडक पोलिसांनी आहुजी याला अटक केली आहे़ तो एका कन्स्ट्रक्शन साईटवर सुरक्षारक्षक म्हणून काम करतो़ त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ त्याच्या चार नातेवाइकांवर शांततेचा भंग केल्याबद्दल पोलिसांनी खटले भरले आहेत़ सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड अधिक तपास करीत आहेत़रविवारी रात्री रस्त्याने आरडाओरडा करीत जाणाºया दुचाकीस्वाराला पोलिसांनी अडविल्याने त्याने पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्कीकेली होती़ त्यानंतर लगेच हा दुसरा प्रकार आहे़

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे