शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण झालेल्या चिमुरड्याची पोलिसांकडून अवघ्या 11 तासांत सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 09:49 IST

10 लाखांची मागितली होती खंडणी; फरार अपहरणकर्त्यांचा शोध सुरू

पुणे : दहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या दोन वर्षाच्या मुलाची पोलिसांनी सुखरुप सुटका केली. पोलिसांनी 11 तासांमध्ये अपहरण करण्यात आलेल्या चिमुरड्याची सुटका केली. मात्र अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती लागू शकले नाहीत. सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. वडाची वाडी येथील बंगल्याच्या आवारात खेळत असताना दोन वर्षांच्या पुष्कराज धनवडेचं काल (शनिवारी) संध्याकाळी अपहरण झालं. पुष्कराजचे वडील सोमनाथ धनवडे व्यावसायिक आहेत. साडेसातच्या सुमारास अपहरण झाल्यानंतर थोड्याच वेळानं अपहरणकर्त्यांनी सोमनाथ यांना फोन करुन 10 लाखांची खंडणी मागितली. सोमनाथ यांनी याबद्दलची माहिती तातडीनं पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांची विविध पथकं कामाला लागली. अपहरणकर्ते हे उंड्री परिसरात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी, कर्मचारी असा ७० ते ८० जणांचा फौजफाटा रात्री उंड्रीमध्ये दाखल झाला. त्यांनी या परिसरातील एक एक जागा पिंजून काढण्यास सुरुवात केली.युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण व त्यांचे कर्मचारी उंड्री भागातील सेक्टर ४९ मध्ये शोध घेत होते. पहाटेच्या सुमारास त्यांना तेथे एका बाजूला तीन ओसाड बंगले आढळले. त्यांनी या बंगल्याची झडती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा एका बंगल्यात हालचाल जाणवली. तेव्हा त्यांनी आपल्या पथकाला सावध केलं. या बंगल्याला दारं नव्हती. त्यांनी आत प्रवेश केला असता बंगल्याच्या तारेच्या कंपाऊंडवरुन एक जण पळून जाताना दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता पुष्कराज धनवडे तेथे आढळून आला. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन पुष्कराजची सुटका करण्यात यश मिळवले़. याबद्दल धनवडे यांनी पोलिसांचे आभार मानले. 

टॅग्स :Kidnappingअपहरण