शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीत लांबलेल्या पोलीस भरतीला अखेर मुहुर्त; १४ हजार जागांसाठी होणार मेगा भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 19:35 IST

भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण

बारामती : कोरोनासह विविध कारणांमुळे २०१९ पासून लांबलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर मुहुर्त मिळाला आहे. राज्यात मेगा पोलीस भरती प्रक्रिया सुरू अखेर सुरु होणार आहे. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

बहुप्रतिक्षीत पोलीस भरती प्रक्रिया ३ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. त्याबाबतचे परिपत्रक पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांनी प्रसिध्द केले आहे. त्यानुसार फक्त पोलीस शिपाई पदांसाठीची ही भरती प्रक्रिया १४९५६ जागांसाठी आहे. राज्य राखीव पोलीस दल व पोलीस वाहन चालक यांची या व्यतीरिक्त स्वतंत्र भरती प्रक्रिया त्याच वेळी सुरू होणार आहे. त्यामुळे जागांमध्ये काही बदल होऊ शकतो. पोलीस शिपाई पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया ३ नोव्हेंबर पासून ३० नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच साधरणत: २७ दिवस असणार आहे.

पोलीस शिपाई पदासांठी होणाऱ्या या भरतीप्रक्रियेमध्ये प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यातील पोलीस घटकांची एकाच दिवसी आयोजित केली जाणार आहे. शारीरीक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार ११० प्रमाणात १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेत सुध्दा किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरीक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण १५० गुणांमधून केली जाणार आहे.

बारामतीतील सह्याद्री करीअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी सांगितले की,  सन २०१९  पासून कोरोना महामारीमुळे व इतर कारणांनी पोलीस भरती प्रक्रिया लांबत गेली होती. उमेदवार खुप आशेने या भरती प्रक्रियेची वाट पाहत होते. शासनाने सर्वात मोठी भरती प्रक्रिया सुरू केल्यामुळे उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरासह ग्रामीण भागातील तरुणांनी यासाठी मोठी तयारी केली आहे. यामध्ये मुली देखील मागे नाहीत. कोरोनानंतर सरकारी नोकरीचे महत्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे या भरतीसाठी मोठी उत्सुकता असल्याचे रुपनवर म्हणाले.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसexamपरीक्षाGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या