शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्ट्यासह राजगडावर दोघे जेरबंद, तपासणी करताना पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 02:43 IST

नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने राजगडावर जाण्याच्या पर्यटकांची तपासणी करताना राजगडाच्या पायथ्याशी पाल खुर्द येथे वेल्हा पोलीसांनी गावठी कट्ट्यासह दोघे सराईत गुन्हेगार जेरबंद केले.

मार्गासनी - नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने राजगडावर जाण्याच्या पर्यटकांची तपासणी करताना राजगडाच्या पायथ्याशी पाल खुर्द येथे वेल्हा पोलीसांनी गावठी कट्ट्यासह दोघे सराईत गुन्हेगार जेरबंद केले. त्यांच्याकडे ७ जिवंत काडतुसेही सापडली. या प्रकारामुळे राजगड वेल्ह्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. नीलेश शिवाजी गाडे (वय २४ ,रा. जनता वसाहत, पुणे) व युवराज भागुजी काळे (वय १८, रा. पर्वती, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.घातपाती कृत्य करण्याच्या हेतूने दोघे जण गावठी कट्टे ,काडतुसे घेऊन आले असावे, असा अंदाज वेल्हा पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.३१ डिसेंबरच्या निमित्ताने राजगडाच्या पाली दरवाजा येथे रविवार दुपारी साडेचारच्या सुमारास पोलीस हवालदार वळकुंदे, जी. बी. लडकत, साळुंखे, गुंडगे, दुर्ग मावळा संघटनेचे कार्यकर्ते असे पर्यटकांच्या वाहन, बॅग अशा सामानांची तपासणी करीत होते.नीलेश व युवराज यांच्या बॅगेमध्ये २ गावठी कट्टे व ७ जिवंत काडतुसे सापडली. वेल्हा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे म्हणाले.दोन्ही आरोपींवर आर्म अ‍ॅक्टप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.या प्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. वेल्हा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे अधिक तपास करत आहेत.राजगडावर जाणा-या गुंजवणी व पाल खुर्द या दोन्ही मार्गावर वेल्हा पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.प्रथमच यंदा ३१ डिसेंबर रोजी पर्यटकांची कसून तपासणी करण्यात आली.

टॅग्स :Crimeगुन्हा