शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

खाकीवर डाग ! पुण्यात पोलीस कर्मचा-यानं बनवला विवाहितेचा अश्लील व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 13:13 IST

पुणे पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आंघोळ करणाऱ्या एका विवाहित महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देपोलिसानं बनवला महिलेचा अश्लील व्हिडीओनराधम पोलिसाला ठोकल्या बेड्याआरोपी पोलिसाचे अन्य तीन साथीदार फरार

पुणे -  पुणे पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आंघोळ करणाऱ्या एका विवाहित महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे घाणेरडं कृत्य करताना त्यानं तीन साथीदारांना सोबत घेऊन पीडित महिलेच्या पतीला अडवून दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी कर्मचाऱ्याला अटक केली असून त्याचे तीन साथीदार फरार झाले आहेत.ही घटना सोमवारी (25 सप्टेंबर) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चतुःश्रृंही परिसरात घडली आहे.

समीर पटेल असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. समीर पटेलविरोधात 30 वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली आहे. आपला अश्लील व्हिडीओ बनवण्यात आल्याचे पीडितेला समजताच तिनं तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली व तक्रार नोंदवली. पोलिसांनीदेखील महिलेच्या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेत कारवाई केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी औंध पोलीस लाईन येथे राहतो व तो खडक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होता. त्याच्या शेजारी फिर्यादीचे घर आहे. पीडित महिला बाथरूममध्ये आंघोळ करत असताना शेजारी राहणारा पोलीस शिपाई समीरनं फिर्यादीचे अर्धनग्न अवस्थेचे मोबाइलमध्ये शुटींग केले. पीडित महिलेच्या पतीला ही बाब समजताच तो जाब विचारायला गेला असता आरोपीची पत्नी, भाऊ आणि सासूने महिलेच्या पतीला दमदाटी करून शिवीगाळ केली. याप्रकरणी आरोपीसहीत त्याची पत्नी, भाऊ व सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.