शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मावळात पोलीस पाटलांचे ‘जागते रहो’: रात्र गस्तीसाठी पोलिसांना मदत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 18:03 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नोंद, तपासणीच्या सुचना तसेच गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी उपक्रम

ठळक मुद्देग्रामसुरक्षा दलाचाही सहभाग, चोरीचे प्रकारही रोखणार

वडगाव मावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नोंद घेणे, त्यांना तपासणीच्या सुचना देणे,तसेच गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गावोगावचे पोलीस पाटील रात्रीची गस्त घालणार आहेत. त्यात महिलांचाही समावेश राहणार आहे. दुचाकी चोरी, घरघोडी, लुटमार अशा वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. वडगाव मावळपोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या ४८ गावांमध्ये पोलिसांची संख्या कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भूमिकेत पोलिस मित्र, ग्रामसुरक्षा दल, पोलिस पाटीलही रात्रीची गस्त घालणार आहेत. पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सांगितले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे इतर भागातील नागरीक मोठ्या प्रमाणावर येतात. ज्या गावात येतील त्या गावातील पोलिस पाटलांनी त्यांची नोंद घेऊन आरोग्य खात्यामार्फत तपासणी करण्यासाठी त्यांना पाठवायचे. तसेच गावात कोण येतय कोण जातय यावर लक्ष ठेवायचे. अशा सुचना देण्यात आल्या.पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून ही गस्त सुरू करण्यात घोषणा केल्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी पोलिस पाटलांची बैठक घेऊन सुरवात वडगाव मावळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून गस्तीचे कामही सुरू झाले आहे. वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडगाव, कान्हे, आंदरमावळ, टाकवे, जांभुळ यासह  ४८ गावांचा समावेश आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण वडगाव असल्याने विविध पक्षांचे मोर्चे, बंदोबस्त व इतर कामांचा सतत लोड असतो. ४८ गावे असुनही तीन अधिकारी व फक्त ३७ पोलिस कार्यरत आहेत.त्यात चो-या, घरफोड्या विविध गुन्हे घडत असल्याने पोलिसांवर कामाचा  ताणतणाव येऊ लागला आहे. त्यांचा ताण कमी करण्यासाठी पोलिस पाटलांनीही गस्तीसाठी तयारी दाखवून सहभागी झाले. गस्तीदरम्यान संशयित आढळल्यास पोलिसांना कळवावे. जबरी चोरी असे प्रकार आपल्या गावात घडू नये याची काळजी घ्यावी., अशा विविध सुचना पोलिस पाटलांना देण्यात आल्या.

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस