शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्या तरुणाईवर पोलिसांचा लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 01:15 IST

फर्ग्युसन रोडवर जमलेल्या तरुणांवर लाठीमार

पुणे : विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या पाकिस्तानवरील विजयानंतर फर्ग्युसन रोडवर मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यासाठी जमलेल्या तरुणाईवर पोलिसांनी जोरदार लाठीमार केल्याची घटना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या डेक्कन जिमखान्यावर सुमारास घडली.भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी फर्ग्युसन रोडवर मोठ्या संख्येने तरुणाई जमली होती. दुचाकी, चारचाकी, जीपवर चढून हवेते तिरंगा फडकावित ते जल्लोष करीत होते. त्यामुळे संपूर्ण रस्ता अडविला गेला होता. मोठमोठ्या आवाजात गाड्यांवर स्पिकर लावून  पेट्रोल पंपाशेजारी तरुण गाड्यांवर चढून नाचत होते. काही तरुण तिरंगा झेंडा घेऊन बसवर चढून नाचत होते. त्यामुळे संपूर्ण फर्ग्युसन रोड पूर्णपणे जाम झाला होता. हे पाहिल्यावर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गुडलक चौकातून जलद कृती दलाचे काही जवान हातात काठ्या घेऊन धावत आले. त्यांनी पुढे मागे न पाहता समोर दिसेल, त्यांच्यावर लाठीमार करण्यास सुरुवात केली. त्याच्या लाठीच्या तडाख्यात काही लहान मुलेही सापडली. काही जण नाचणाऱ्या या तरुणांचा व्हिडिओ काढत होते. त्यांनाही या जवानांच्या लाठीचा प्रसाद मिळाला. पोलिसांच्या या लाठीमारामुळे कडेच्या गाड्याही अस्ताव्यस्त पडला. जमलेले तरुण वाट मिळेल तिकडे पळत सुटले. त्यात अनेक जण पडून किरकोळ जखमी झाले. काही मिनिटात पोलिसांनी चौक रिकामा केला.

टॅग्स :ICC World Cup 2019वर्ल्ड कप 2019India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान