शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उपचारासाठी पुण्यात आलेल्या रेल्वे प्रवाशाचे पोलीस निरीक्षकाने वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 15:31 IST

धावत्या लोकलमधून तोल गेल्याने खाली पडत असलेल्या या नागरिकाला धावत जाऊन पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे आणि पोलीस कर्मचारी सचिन राठोड यांनी बाहेर खेचत प्राण वाचविले.

ठळक मुद्देपुणे रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली घटना महादेव येवले यांनी व्यक्त केले पोलिसांचे आभार

पुणे : उपचारांसाठी पुण्यामध्ये आलेल्या बारामतीच्या नागरिकाचे प्राण पुणे लोहमार्ग पोलिसांनी वाचविले. धावत्या लोकलमधून तोल गेल्याने खाली पडत असलेल्या या नागरिकाला धावत जाऊन पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे आणि पोलीस कर्मचारी सचिन राठोड यांनी बाहेर खेचत प्राण वाचविले. ही घटना सोमवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास रेल्वे स्थानकावर घडली.लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव येवले (रा. बारामती) हे सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास पुण्यात आले. वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना पिंपरीला जायचे होते. त्यामुळे ते पुणे रेल्वे स्थानकांवर आलेले होते. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे आणि कर्मचारी सचिन राठोड फलाट क्रमांक एकवर पायी गस्त घालीत होते. दरम्यान, फलाट क्रमांक एकवर दौंडवरुन आलेली डीएमयू आली. ही गाडी फलाटावर लागली असतानाच येवले गाडीमध्ये चढले. ही गाडी लोणावळा येथे जात असल्याचा त्यांचा समज झाला होता. मात्र, ही गाडी यार्डामध्ये जात असल्याचे समजताच येवले यांनी घाईघाईत खाली उतरण्याचा प्रयत्न केला. गाडीने वेग घेतलेला असल्याने येवले यांचा तोल गेला. त्यांचा पाय फलाटावर पडण्याऐवजी गाडी आणि फलाटाच्यामधील मोकळ्या जागेत पडला. हे दृश्य पायी गस्त घालीत असलेल्या निरीक्षक खंडाळे यांनी पाहिले. त्यांनी तत्काळ येवले यांच्याकडे धाव घेतली. कर्मचारी राठोड यांच्या मदतीने येवले यांना बाहेर खेचत त्यांचे प्राण वाचविले. येवले यांनी आपले प्राण वाचविल्याबद्दल पोलिसांचे आभार व्यक्त केले.

टॅग्स :pune railway stationपुणे रेल्वे स्थानकRailway Passengerरेल्वे प्रवासीPuneपुणे