शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस सुटीवर; कोंडी रस्त्यावर

By admin | Updated: October 26, 2015 01:41 IST

गेल्या वर्षी महापालिकेने वाहतुकीस अडथळा होत असल्याचे कारण पुढे करीत डांगे चौकातील ‘आठवडे बाजार’ बंद करण्याचा निर्णय घेतला

आठवडे बाजारामुळे कोंडीवाकड : गेल्या वर्षी महापालिकेने वाहतुकीस अडथळा होत असल्याचे कारण पुढे करीत डांगे चौकातील ‘आठवडे बाजार’ बंद करण्याचा निर्णय घेतला,मात्र चौकातील बीआरटी पुलाचे काम पूर्णत्वाकडे जाताच मोठ्या प्रमाणावर पुन्हा बाजार थाटू लागल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. डांगे चौकातील दुहेरी पुलाखालील जागा पथारी व्यावसायिकांनी गिळंकृत केला आहे,त्यातच चौकाच्या चारही बाजूच्या पदपथावर भाजी व्यावसायिक, विक्रेते तसेच दुकानदारांनी समोर आपले बस्थान मांडल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरली नाही परिणामी त्यांना अति वर्दळीच्या रस्त्यावरून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. डांगे चौकातील उड्डाणपुलाच्या खाली भररस्त्यावर पथारीवाल्यांनी दुकाने थाटून एका बाजूने जाणारी वाहतूक पूर्णपणे अडविली परिणामी दुसऱ्या बाजूने वहानांचा लोंढा अडकून वाहतुकीस अडथळा होत आहे. चौकात गर्दीच गर्दीभोसरी : रविवार सुट्टीचा दिवस, बहुतांशी नोकरदार व मुलांच्या सुट्टीचा दिवस त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक घरा बाहेर पडलेले, मात्र घरा पासून अगदी जवळ असलेल्या भोसरीच्या दिघी रस्ता परिसरात खरेदीला जाणाऱ्या नागरिकांना कळेना काय झाले काहींनी आपल्या पाहिले चौकात गर्दी झाली आहे. वाहने कशीही इकडून तिकडे असलने वाहतूक कोंडी झाली असल्याने सर्वच वाहने जागच्या जागी उभी. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसच नाही. यावेळी नागरिकांनी चौकशी केली असता वाहतूक पोलीस सकाळ पासून कोणीच दिसत नाहीत. सुट्टी दिवशी सायंकाळच्या वेळेला या परिसारत मोठी गर्दी असते असे असताना वाहतूक पोलिस फिरकतच नाहीत रविवारी जणूकाही सर्वाना साप्ताहिक सुट्टी आहे, त्यामुळे पोलिस मामा ही रविवारी दिसत नाहीत अशी चर्चा हि नागरिकांच्या मध्ये चांगलीच रंगाला येत होती. भोसरीतील आळंदी रस्ता हा येथील मुख्य बाजारपेठेचा भाग त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांचा कायम वावर असतो. मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने अनधिकृत पणे पार्किंग केलेले असते. तसेच रस्त्याच्यादोन्ही बाजूला खाद्य पदार्थांच्या हातगाड्या मोठ्या प्रमाणावर आहेत. भोसरीचा हा सर्वात महत्वाचा भाग आहे.इंद्रायणीनगरमध्ये वाहतूक कोंडीइंद्रायणीनगर : वेळ सकाळी १० वाजून २० मिनिटांची... पुणे -नाशिक महामार्गावरील गोडाऊन चौकातील सिग्नल... निवांतपणे गप्पा मारत बसलेले वाहतुक नियंत्रण कक्षाचे कर्मचारी... भरधाव धावणारी अवजड वाहने, जीव मुठीत धरून चालणारे दोन चाकी वाहन धारक, व रस्ता ओलांडत असतांना जिवाच्या आकांताने पळणारी सामान्य जनता. ...ही कुठल्या पुस्तकातील गोष्ट नसून, इंद्रायणीनगर मधील गोडाऊन चौकातील भीषण वास्तव आहे. दहा रस्त्यांच्या वाहतूक नियंत्रणाचा भार असलेल्या या महामार्गावरील महत्त्वाच्या चौकात सकाळी व संध्याकाळच्या वेळेस वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. फक्त २४ पोलीसपिंपळे गुरव : जुनी सांगवी, नवी सांगवी, दापोडी व पिंपळे गुरव परिसरातील लाखो वाहनचालकांसाठी व शेकडो चौकांसाठी फक्त २४ वाहतूक पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. रस्त्यावर व मुख्य चौकामध्ये वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये वाहतूक पोलिसांचा अभाव, बंद असलेले वाहतूक दिवे, वेगवान वाहतूक, खासगी व्यावसायिक, हातगाड्यांचा गराडा, नो पार्किंग व रस्त्यात उभी असलेली वाहने आदींमुळे परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमच ऐरणीवर येत आहे. वाहतूक पोलिसाकडून कारवाई होत नसल्याने या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावणार तरी कोण, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. सांगवी फाटा, बीआरटी रस्त्यालगत सांगवी वाहतूक विभाग आहे. परिसरातील वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांच्या संख्येतही कमालीची वाढ झाली आहे. मात्र वर्षानुवर्षे वाहतूक पोलिसांची संख्या दर वर्षीसारखीच आहे. जुनी सांगवीत शितोळेनगर चौक, गुरुनानक चौक, तसेच नवी सांगवीत फेमस चौक, साई चौक, पिंपळे गुरव परिसरात कृष्णा चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, जिजामाता चौक, तसेच दापोडीतील शितळादेवी चौक, डॉ. आंबेडकर चौक आदी भागात वाहतूक दिवे आहेत. मात्र कोणत्याही चौकात वाहतूक पोलीस किंवा वॉर्डन दिसत नाही. पोलीस गैरहजरचिंचवड : परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवले जात नसल्याचे वास्तव समोर येत आहे. बहुतांशी मुख्य चौकात वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याने वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. वाहन चालाक मनमानी करत असल्याचे दिसत आहे. वाहतूक शाखेच्या अनियोजित कारभारामुळे अवैध वाहतूक जोमात सुरु आहे. मोशी वाहतूक कोंडीमोशी : मोशीतील टोलनाका, भारत माता चौक, मोशी मुख्य चौक जुना जकात नाका, राजे शिवछत्रपती चौक असे चौक पुणे-नाशिक मुख्य महामार्गावर आहेत. या चौकामध्ये पोलिसांकडून आवश्यक ती उपाययोजना केलेली नाही. राजे शिवछत्रपती चौकात वाहतूककोंडी, तर नित्याचाच विषय बनला आहे.