- जयवंत गंधाले - हडपसर : हडपसरच्या गर्दीत ती हरवते, शाळेत जाते... शाळेत ही नवी कोण मुलगी आली म्हणून शिक्षक चौकशी करतात. शिक्षक पोलिसांना माहिती देतात. त्याच वेळी पेट्रोलिंग करणारे पोलीस तेथे जातात. पोलिसांना शिक्षक सांगतात या शाळेतील ही मुलगी नाही, ती रडत असते, तिला चक्कर येत असते. म्हणून रुग्णालयात उपचार करतात. ती केवळ गार्डन व वडील टेलरिंगचे काम एवढी छोटी ओळख पोलिसांना सांगते.आणि या ओळखीवर तिचा हरवण्याचा प्रवास संपतो.. हडपसर येथील साधना शाळेत शनिवारी एक अनोळखी मुलगी येते. त्यानंतर चित्रपटातील कथानकासारखी कथा सुरु असल्यासारखा प्रसंग घडतो. शहरातील काही मुख्य वस्तू किंवा चौक हे शोध कार्यात किती महत्वाचे ठरतात हे आज हडपसरमध्ये दिसून आले. हडपसर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस तिला विश्वासात घेऊन पत्ता तिचा शोधू लागतात. केवळ हडपसरमधील गार्डनजवळ एका टेलरिंगच्या दुकानात तिचे वडील काम करतात. एवढेच तिला माहिती होते. यावरून येथील पोलीस तिच्या वडिलांचा शोध घेतात.ती इकडे हरवली असताना तिच्या घरी परिस्थिती वेगळी असते. उरूळीकांचन येथील तिच्या घरी ती न दिसल्याने शोधाशोध सुरु होते. तेथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार तो पर्यंत हडपसर पोलिसांचा त्यांना फोन जातो आणि तिचे घराचे सुटकेचा श्वास सोडतात. मुलगी त्यांच्या समोर येताच मुलीला मिट मारतात, कवटाळतात, त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. तिला चक्कर येते असल्याने तिला पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेतात. विलास राठोड व युवराज कांबळे हे दोन पोलीस कर्मचारी यांच्या प्रयत्नाने त्यामुलीला आपला परिवार मिळाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाने तिला तिच्या घरापर्यंत पोलिसांनी सुखरूप पोहचवले. आजचा हा तिचा प्रवास चित्रपटातील कथेसारखाच होता. पोलसांनी केलेल्या प्रयात्नांना यश आल्याने त्या परिवारात आज तिच्या जाण्याने एक आनंद निर्माण झाला आहे...............
एका छोट्याशा ‘खुणे’वर पोलिसांनी शोधली चिमुरडीची हरवलेली वाट ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 18:52 IST
हडपसर येथील साधना शाळेत शनिवारी एक अनोळखी मुलगी येते. त्यानंतर चित्रपटातील कथानकासारखी कथा सुरु असल्यासारखा प्रसंग घडतो.
एका छोट्याशा ‘खुणे’वर पोलिसांनी शोधली चिमुरडीची हरवलेली वाट ...
ठळक मुद्देशहरातील काही मुख्य वस्तू किंवा चौक हे शोध कार्यात किती महत्वाचे ठरतात हे निदर्शनास