शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खुनी जोडप्याला अटक, ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 02:34 IST

घरात कोंबड्या शिरल्या म्हणून झालेल्या भांडणाच्या कारणावरून चिडून जाऊन पत्नीच्या सांगण्यावरून एकाने शेजारी राहणा-या महिलेच्या तोंड व गळ्यावर कुºहाडीने वार करून तिचा खून करून दोघेही पती-पत्नी फरार झाले होते.

लोणी काळभोर : घरात कोंबड्या शिरल्या म्हणून झालेल्या भांडणाच्या कारणावरून चिडून जाऊन पत्नीच्या सांगण्यावरून एकाने शेजारी राहणा-या महिलेच्या तोंड व गळ्यावर कु-हाडीने वार करून तिचा खून करून दोघेही पती-पत्नी फरार झाले होते. या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी निलंगा तालुक्यातून अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.अनिल तुकाराम रणदिवे आणि रुक्मिणी अनिल रणदिवे अशी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर गोरख जाधव (वय २२, रा. आळंदी म्हातोबाची, कोळसकर वस्ती, ता.हवेली) यांनी फिर्याद दिली होती. ही घटना गुरुवारी (दि. २३) रात्री साठेआठच्या सुमारास घटली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास मृत नंदा या कामावरून घरी आल्या. त्यांना काही वेळाने त्यांच्या शेजारी रहात असलेल्या रूक्मिणी रणदिवे यांच्या भांडणाचा आवाज आल्याने ज्ञानेश्वर व त्यांची आई हे तेथे गेले असता रणदिवे यांच्या कोंबड्यांनी नंदा यांच्या झोपडीत घुसून गृहपयोगी साहित्याची पडझड केली होती.या कारणांवरून दोघींमध्ये वाद चालला होता. थोड्या वेळाने दोघी शांत झाल्या व आपापल्या घरी गेल्या. रात्री सव्वाआठच्या सुमारास ज्ञानेश्वर जाधव हे आपल्या घरी असताना त्याच्या नंदा मावशी या मोठमोठ्याने ओरडून त्याला व त्याच्या वडिलांना अनिल मला मारायला आला आहे, असे सांगत होत्या. हे ऐकून जाधव कुटुंबीय पळत घराबाहेर आले. त्यावेळी नंदा या आपल्याघराबाहेरील अंगणात उभ्या व त्यांचेसमवेत अनिल रणदिवे हा हातात कु-हाड घेऊन त्याच्या शेजारी पत्नी रूक्मिणी उभी असल्याचे त्यांना दिसले.रूक्मिणीने अनिल रणदिवे याला नंदा या कोंबड्या वरून भांडण करत असल्याचे सांगत होत्या. यावेळी अनिल याने त्याच्या हातातील कु-हाडीने नंदा यांचेवर घाव घातला.यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.अनिल यांस पकडण्यासाठी जाधव कुटुंबीय व अंकुश लोंढे हे पुढे आले असता त्याने त्यांनाहीकु-हाडीने मारण्याची धमकी दिली. यानंतर दोघेही दुचाकीवरून फरार झाले होते.अन्सारवाडा येथून अटकमाळी यांच्या खुन्यास पकडण्यासाठी हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले पोलीस हवालदार विशाल रासकर व नितीन सुद्रीक या पोलीस पथकाची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी अगदी शिताफीने तपास करून अनिल तुकाराम रणदिवे यास व त्याची पत्नी रूक्मिणी या दोघांना अन्सारवाडा (ता. निलंगा, जि. लातूर ) येथे जेरबंद केले.

टॅग्स :PuneपुणेArrestअटकMurderखून