शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

1 कोटी लाच प्रकरणात तहसीलदार डोंगरेसह पत्रकाराला अटक, २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 21:24 IST

१ कोटी रुपयांची लाच स्वीकारताना पकडलेले तहसीलदार सचिन महादेव डोंगरे याच्यासह पत्रकार किसन सोमा बाणेकर या दोघांना रविवारी अटक करण्यात आली.

पुणे : मूळशी तालुक्यातील लवळे येथील वडिलोपार्जित सामायिक ईनामी वर्ग शेत जमिनीबाबत निकालपत्र तक्रारदारांच्या बाजूने देण्यासाठी १ कोटी रुपयांची लाच स्वीकारताना पकडलेले तहसीलदार सचिन महादेव डोंगरे याच्यासह पत्रकार किसन सोमा बाणेकर या दोघांना रविवारी अटक करण्यात आली. त्यांना सायंकाळी उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना अधिक तपासासाठी २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.सचिन डोंगरे यांना लाचप्रकरणी पकडल्यानंतर त्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापडी गावी बंगला असल्याची माहिती मिळाली. तसेच मोहोळ येथील बँक ऑफ इंडिया शाखेत लॉकर तसेच करमाळा येथेही आणखी एक लॉकर असल्याची माहिती मिळाली. त्याच्या चाव्या डोंगरे यांच्याकडे आहेत. डोंगरे यांच्या सोलापूर येथे बंगला आहे. त्याची झडती घेण्यात आली असून त्याचा रिपोर्ट अद्याप आलेले नाही. डोंगरे यांनी खासगी व्यक्ती किसन सोमा बाणेकर (वय ४०, रा. लवळे, ता. मुळशी) याच्या हस्ते डोंगरे यांनी ही रक्कम स्वीकारली आहे.याबाबतची माहिती अशी, तक्रारदार हे ६३ वर्षांचे असून सध्या ते दौंड येथे राहतात. शितोळे सरकार यांना मुळशी तालुक्यात अनेक ठिकाणी ईनामी जमिनी मिळाल्या आहेत. तक्रारदार हे त्यांचे वारसदार असून त्यांची लवळे येथे शेतजमीन वडिलोपार्जित सामायिक ईनामी वर्ग पाच एकर आहे. ही शेतजमीन त्यांच्या सर्व भाऊ बंदाची फसवणूक करून प्रकाश कृष्णराव शितोळे यांनी परस्पर विकली. याबाबत त्यांनी वेळोवळी वारस नोंदीबाबत तहसील कार्यालयाशी संपर्क साधला होता. या वारसा नोंदीबाबतची फाईल मंत्रालयात गेली होती. तेथील सचिवाने यातील कागदपत्रांची पुन्हा छाननी करुन अहवाल देण्यास मूळशी तहसीलदार सचिन डोंगरे यांच्याकडे पाठविली होती. तक्रारदारांनी वेळोवेळी याबाबत संपर्क साधून त्यांना निकालपत्र देण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी निकालपत्र देण्यासाठी १ कोटी रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १४ डिसेंबरला केली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर शनिवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. लवासा रस्त्याजवळील उरवडे गावाजवळील एका कंपनीच्या गेटसमोर किसन बाणेकर याच्यामार्फत १ कोटी रुपये स्वीकारताना डोंगरे यांना पकडण्यात आले. शिवाजीनगर येथील न्यायालयात रविवारी सायंकाळी दोघांना हजर करण्यात आले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. हेमंत जंजाळ, अ‍ॅड. नंदकुमार शिंदे, अ‍ॅड. विवेक भरगुडे, अ‍ॅड. कुमार पायगुडे यांनी काम पाहिले. डोंगरे यांनी ज्या कामासाठी ही लाच स्वीकारली. ती त्या संदर्भातील कागदपत्रे ही त्यांच्या कार्यालयात असून कार्यालय बंद असल्याने कागदपत्रांच्या प्रती तपासून ताब्यात घ्यायच्या आहेत. त्यांच्या बंगल्याची झडती पूर्ण झालेली नाही. तसेच त्यांच्या बँक लॉकरची तपासणी करायची आहे. किसन बाणेकर याचा तहसीलदार कार्यालयात वावर असून, तो खासगी एजंट म्हणून काम करीत असल्याने त्याच्याकडे चौकशी करायची आहे. यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने दोघांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.