दादाराम ताकमोडे असे या हवालदाराचे नाव आहे. ताकमोडे याची नेमणूक शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आहे. याप्रकरणी एका २९ वर्षांच्या तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या भावाला स्वारगेट पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात बंडगार्डन लॉकअपमध्ये ठेवले होते. भावाला मदत करतो, असे सांगून ताकमोडे याने या तरुणीशी ओळख करुन घेतली. तिचा मोबाईल नंबर घेऊन तिच्याशी बोलणे सुरु केले. १ ते २४ डिसेंबर २०२० दरम्यानच्या काळात ताकमोडे याने फिर्यादीसोबत ओळख करुन घेऊन त्यांच्याशी वेळोवेळी फोनवर बोलून लग्नासाठी स्थळ दाखविण्याचा बहाणा केला. त्यांना २४ डिसेंबर २०२० रोजी फिर्यादी यांना दुपारी साडेतीन वाजण्याचे सुमारास फोन करुन अग्रवाल लॉज येथे नेऊन त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
विनयभंग करणाऱ्या पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:14 IST