शिरूर-भीमाशंकर राज्य महामार्गावर पोलिसांनी केली नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:09 AM2021-04-21T04:09:51+5:302021-04-21T04:09:51+5:30

पुणे ग्रामीण पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी. एल. गिजरे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल मोरमारे, पोलीस पाटील ...

Police blockade Shirur-Bhimashankar state highway | शिरूर-भीमाशंकर राज्य महामार्गावर पोलिसांनी केली नाकाबंदी

शिरूर-भीमाशंकर राज्य महामार्गावर पोलिसांनी केली नाकाबंदी

Next

पुणे ग्रामीण पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी. एल. गिजरे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल मोरमारे, पोलीस पाटील दीपक पावडे, ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र मस्के, ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप हुंडारे, शंकर गोपाळे यांच्या संयुक्त पथकाने कडक अंमलबजावणी केली आहे. बाजारपेठेत विनामास्क आणि विनाकारण फिरणाऱ्या १५० जणांवर तसेच शासनाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे ३० दुकानदारांना दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण अतिप्रमाणात वाढत आहे. राज्याची आरोग्य व्यवस्थाही याला तोकडी पडत आहे. नागरिकांनी त्रिसूत्री नियमांचे पालन करून कामाशिवाय घराबाहेर पडू नये. असे आवाहन पोलीस हवालदार गिजरे यांच्याकडून करण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना पोलीस कर्मचारी व वाडा ग्रामपंचायतीचे कर्मचारी.

Web Title: Police blockade Shirur-Bhimashankar state highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.