शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलीस आरोग्य कर्मचारी बनले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 16:08 IST

कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाची कारवाई

पुणे: जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार गेली ८ वर्षे फरार होता. तो घरी असल्याचे समजल्यावर कोंढवा पोलिसांनी महापालिकेचे आरोग्य कर्मचारी असल्याचे सांगत सर्व्हेचा बहाणा करुन त्याच्या घरात प्रवेश मिळविला व त्याला जेरबंद करण्यात यश मिळविले.योगेश बुद्धीराम माळी (वय ३२, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. तो जून २०१३ पासून पोलिसांना गुंगारा देत होता. शेवटी कोरोनाचा संसर्गाचा फायदा घेऊन सर्व्हेच्या नावाखाली त्याला पकडण्यात यश मिळविले. कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस नाईक कौस्तुभ जाधव यांना योगेश जाधव हा घरी आला असल्याची माहिती मिळाली होती. त्याने अनेकदा पोलिसांना गुंगारा दिला असल्यामुळे कोंढवा पोलिसांनी यावेळी काळजी घेतली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, सहायक फौजदार इक्बाल शेख, हवालदार योगेश कुंभार, गणेश आगम, दीपक क्षीरसागर, सुशील धिवार, मोहन मिसाळ, उमाकांत स्वामी हे पथक महापालिकेचे आरोग्य कर्मचारी बनले. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सर्व्हे करण्याचा बहाणा त्यांनी केला व योगेश याच्या घराबाहेर सापळा लावला. पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे यांनी घरात प्रवेश केला. तेव्हा त्याचे कुटुंबीय घाबरले होते. त्यांची भेदरलेली अवस्था पाहून व आरोपी पूर्वइतिहास लक्षात घेऊन थोडा जरी संशय आल. तर तो पळून जाईल हे लक्षात घेऊन शिंदे यांनी आपण महापालिकेकडून आलो आहे. ते रहात असलेल्या परिसरामध्ये व अवतीभोवती कोरोना पेशंट असल्याची माहिती मिळाली. सर्व्हे करीत आहोत, असे सांगून कुटुंबातील लोकांची माहिती विचारली. घरातील कोणाला ताप, खोकला काही आहे का, सर्वांना समक्ष आणा, असे सांगून तपासणीचे नाटक करीत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कुटुंबियांनी योगेश माळी याला समोर आणले. तो आपल्या टप्प्यात असल्याचे लक्षात आल्यावर शिंदे यांनी व बरोबरच्या कर्मचार्‍यांनी त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या