शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीच्या ठिकाणी औरंगाबादचा पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 22:34 IST

पोलीस शिपाईपदासाठी सध्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात उमेदवारांच्या शारिरीक चाचणी घेण्यात येत आहे. या ठिकाणी उमेदवारांशिवाय इतरांना येण्यास मनाई करण्यात आली आहे, असे असताना गुरुवारी सकाळी पोलिसांना एक संशयित तरुण तेथे रेंगाळताना आढळून आला. 

पुणे : पोलीस शिपाईपदासाठी सध्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात उमेदवारांच्या शारिरीक चाचणी घेण्यात येत आहे. या ठिकाणी उमेदवारांशिवाय इतरांना येण्यास मनाई करण्यात आली आहे, असे असताना गुरुवारी सकाळी पोलिसांना एक संशयित तरुण तेथे रेंगाळताना आढळून आला. पोलिसांनी त्याला बोलावून चौकशी केल्यावर तो चक्क औरंगाबाद पोलीस दलात शिपाई असल्याचे आढळून आले. त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो इथे का आल्याबाबत चौकशी केली. पण त्याच्याकडून कोणताही गुन्हा घडला नसल्याने त्याला चौकशीनंतर सोडून देण्यात आले.पोलीस भरतीमध्ये कोणत्याही प्रकारे गैरमार्गाचा वापर होऊ नये, यासाठी ही परीक्षा पद्धत अतिशय पारदर्शक ठेवण्यात आली आहे. कोणी अशा प्रकारे गैरमार्गाचा अवलंब करीत असेल, तर त्याची माहिती कळविल्यास त्यांना बक्षीस देण्याचे जाहीर आवाहन पुणे ग्रामीण पोलीस दलाने केले आहे. पुणे पोलीस दलात शिपाईपदाच्या भरतीसाठी सुमारे ४६ हजार जणांनी अर्ज दाखल केले आहेत.शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सध्या दररोज अडीच हजार जणांची शारीरिक चाचणी घेतली जात आहे. यात कोणाला गैरप्रकारास वाव राहू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. असे असताना भरतीच्या ठिकाणी पोलीस आढळल्याने गुरुवारी एकच चर्चेचा विषय झाला होता. याबाबत पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी सांगितले की, गंगापूर तालुक्यात राहणारा व औरंगाबाद पोलीस दलातील एक पोलीस शिपाई भरतीच्या ठिकाणी संशयास्पदरित्या फिरताना दिसला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याला सोडून देण्यात आले.

टॅग्स :Policeपोलिस