शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी दुचाकी चोरांचा लावला छडा, मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:19 IST

गस्तीदरम्यान दुचाकीचोरांचा छडा लावण्यात बारामती पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी १ लाख रुपयांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पकडण्यात आलेल्या तिघांमध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.

बारामती - गस्तीदरम्यान दुचाकीचोरांचा छडा लावण्यात बारामती पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी १ लाख रुपयांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पकडण्यात आलेल्या तिघांमध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी याबाबत माहिती दिली. प्रवीण पांडुरंग मोहिते (वय ४२, रा. कल्पनानगर, तांदुळवाडी, ता. बारामती) यांची पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी २५ मे २०१८ रोजी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती.८ आॅगस्ट रोजी पोलीस हवालदार डोईफोडे, जगताप हे रात्रीच्या वेळी गस्त करीत होते. त्या वेळी एमईएस हायस्कूलसमोर बिगर नंबरप्लेटची दुचाकी भरधाव वेगाने जाताना दिसून आली.पोलिसांना याबाबत संशय आल्याने त्यांनी दुचाकीचा पाठलाग करून दुचाकी पकडली. अटक केलेल्या तरुणांसमवेत ३ अल्पवयीन तरुणही या घटनांमध्ये सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेल्या दुचाकी बारामती शहर, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरून नेल्याचे आरोपींनी कबूल केले.तसेच दुसऱ्या एका कारवाईत अजित हरिभाऊ पोतकुले (वय २५, रा. तपोवन कॉलनी, बारामती) यांची बुलेट आरोपी भगवान महादेव कांबळे (वय २५, रा. वांगी नं. १, करमाळा) हा चोरून घेऊन जाताना त्याला रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे, सहायक फौजदार डी. एन. सोनवणे यांनी कारवाई केली.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा