शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तृप्ती देसाईंना कात्रजमधून अटक; डॉक्टरांना धमकी दिल्यानं कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 11:26 IST

ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना दिली होती धमकी

पुणे: सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना कात्रजमधून अटक करण्यात आली आहे. तृप्ती देसाई यांनी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना काळं फासण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन देसाई यांना अटक केली. डॉ. अजय चंदनवाले यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आठवडाभरापूर्वी पत्रकार परिषद घेऊन केली होती. चंदनवाले यांच्या तोंडाला काळं फासू, असा इशारादेखील त्यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. त्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली. कात्रजमधील राहत्या घरातून देसाई यांना अटक करण्यात आली. 'डॉ. चंदनवाले कोठेही अपंग असल्याचं दिसत नाहीत, आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांनी खोटं प्रमाणपत्र बनवून घेतलं आणि ससूनच्या अधिष्ठातापदी नेमणूक करून घेतली,' असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता. 'कोणत्याही पदावर 3 वर्षांपेक्षा अधिक काळ राहता येत नाही. मात्र मागील 7 वर्षांपासून चंदनवाले एकाच पदावर काम करत आहेत. चंदनवाले हे जळगावचे असल्यानं आधी भाजप नेते एकनाथ खडसे आणि आता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा त्यांना वरदहस्त आहे. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नाही,' असं देसाई म्हणाल्या होत्या.  

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटल