शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

...अशी फिरली चक्र की अलगद जाळ्यात अडकले आरोपी ; पुण्यातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 20:22 IST

कोंढव्यातील शिवनेरीनगर येथील पारसी मैदानात पडीक जागेत पोलिसांनी एका मृतदेह सापडला होता़. पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी तेव्हा नोंद केली होती़ मात्र, त्याचा पुढे काहीही धागादोरा मिळत नव्हता़, मृत्युचे कारणही समोर आले नव्हते़. 

पुणे : कोंढव्यातील शिवनेरीनगर येथील पारसी मैदानात पडीक जागेत पोलिसांनी एका मृतदेह सापडला होता़. पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी तेव्हा नोंद केली होती़ मात्र, त्याचा पुढे काहीही धागादोरा मिळत नव्हता़, मृत्युचे कारणही समोर आले नव्हते़. दरम्यान तब्बल अडीच वर्षानंतर कोंढवा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात वसीम अजमल खान याला अटक केली.  त्याच्याकडे तपास पारसी मैदानात आम्ही एकाचा खुन केल्याची कबुली दिली़. त्यानंतर आता दीड वर्षानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे़. इम्रान रौफ शेख (वय २०), अहमद आयुब खान (वय २५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ तर वसीम अजमल खान (वय ३०) याला यापूर्वी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन शाहरुख ऊर्फ खड्ड्या नूर हसन खान (वय १९, रा़ शिवनेरीनगर, कोंढवा) याचा काही महिन्यांपूर्वी पूर्ववैमनस्यातून खुन झाला आहे़ . याप्रकरणी उपनिरीक्षक अबुजर चाऊस यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. ही घटना कोंढव्यातील शिवनेरीनगर येथील पारसी मैदानात पडीक जागी २८ ऑगस्ट २०१७ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली होती़. निखिल अनिल लोंढे (वय २४, रा़ जांभुळवाडी रोड, कात्रज) याचा खुन केला होता़. निखिल लोंढे हा कात्रजला घरी जाण्यासाठी पुणे स्टेशन येथील सेंट्रल बिल्डिंगजवळ  रिक्षाची वाट पहात होता़. त्यावेळी या चौघांनी त्याला घरी सोडण्याचा बहाणा करुन रिक्षात घेतले़.  त्यानंतर त्याला पारसी मैदानातील पडिक जागी नेले़.  तेथे त्याला धमकावून त्याच्याकडील पैसे व इतर साहित्य जबरदस्तीने काढून घेत होते़. तेव्हा त्याने चौघांना विरोध केला़,त्यामुळे त्यांनी चिडून जाऊन निखिल याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा खुन केला़. त्यानंतर ते मृतदेह तेथेच टाकून पळून गेले होते़. या खुनाचा आता दीड वर्षांनी वाचा फुटली़.  सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनArrestअटकPoliceपोलिसKondhvaकोंढवा