सौरभ गोपाल कुमरेली (वय २१ रा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे, शिवनगर, शिवराय पतसंस्थेच्या बाजूला, मांजरी खुर्द), किरण काशीनाथ सूर्यवंशी (वय २६, रा.किनारा हॉटेलच्या मागे, जयभीमनगर, दापोडी, मूळ गाव-उजळंब, ता. उस्मानाबाद), शुभम संतोष कांबळे (वय २२, रा. सोमेश्वरवाडी, सोमेश्वर मंदिरामागे, चिंचेझाडाची चाळ, पाषाण मूळ गाव बेंबळी, ता. जि/उस्मानाबाद) आणि प्रकाश इरकल (रा.वडारवाडी, मूळ गाव विजापूर, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बिबवेवाडी पोलीस तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना कुंभारवाडा भगली हॉस्पिटल चौकाच्या दिशेने जात असताना पथकातील पोलीस अंमलदार यांना नीलकमल सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाहेर अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील तीन व्यक्ती संशयितरीत्या थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या दिशेने पथक जात असताना ते वेगवेगळ्या दिशेने पळून गेले. त्यांना पकडून चौकशी केली असता त्यांचा फरार साथीदार प्रकाश इरकल याच्यासह सुमारे एक वर्षांपूर्वी इंदिरानगर बिबवेवाडी येथील न्यू बालाजी ट्रेडर्स किराणा मालाचे दुकान रात्रीच्या वेळी शटरचे कुलूप उचकटून दुकानाच्या ड्रॉवरमधून एकूण ५० हजार रूपये घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. त्या तीन आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली. फरारी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ९ गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे. यात १ लाख १५ हजार रूपये किमतीच्या तीन मोटर सायकल, २४ हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, ११ हजार ७०० रूपये रोख रक्कम, १५ हजार रूपये किमतीची तांब्याच्या पितळीची भांडी व साहित्य, ७० हजार रूपयांचा मोबाईल हँडसेट असा २ लाख ३५ हजार ७०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींनी चोरीमधील काही रक्कम चेन आणि मौजमजेसाठी उडवली असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपास पथकाचे प्रभारी अधिकारी राजेश उसगावकर पुढील तपास करीत आहेत.
शहरात घरफोड्या, वाहन आणि मोबाईल चोऱ्या करणारे ४ गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:18 IST