शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातील सुरक्षेकरिता पोलीस प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 20:11 IST

पोलिसांकडून गणेशोत्सव बंदोबस्ताची तयारी सुरू करण्यात आली असून बंदोबस्ताची आखणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

ठळक मुद्देकायदा सुव्यवस्थेसाठी कडेकोट बंदोबस्त : सात हजार पोलीस तैनात

पुणे  :  दैदीप्यमान आणि गौरवशाली अशी भव्य परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाला येत्या सोमवारी सुरुवात होणार आहे.  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात उत्सवाच्या काळात तब्बल सात हजार पोलिसांची फौज देखरेख करणार आहे. इतकेच नव्हे तर सुरक्षेकरिता इतर शहरांमधून देखील अतिरिक्त कुमक मागविण्याचा निर्णय  पोलीस प्रशासनाने घेतला आहे.   पोलिसांकडूनगणेशोत्सव बंदोबस्ताची तयारी सुरू करण्यात आली असून बंदोबस्ताची आखणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पोलिसांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहरात नोंदणीकृत ३ हजार २४५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. पोलीस आयुक्त डॉ.  के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. उत्सवाच्या कालावधीत मध्य भागातील मानाची मंडळे तसेच प्रमुख मंडळांच्या परिसराची बॉम्बशोधक नाशक पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. प्रमुख मंडळांच्या मांडवांच्या परिसरात धातुशोधक यंत्रे (मेटल डिटेक्टर) बसविण्यात येणार आहेत. ध्वनिवर्धकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निदेर्शांचे पालन मंडळांनी करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.  शहरातील संवदेनशील तसेच महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या तुकड्या (एसआरपीएफ) तैनात करण्यात येणार आहेत. गृहरक्षक दलातील जवान (होमगार्ड) मध्यभागात बंदोबस्तासाठी राहणार आहेत. बेलबाग चौक, मंडई परिसरात गर्दी होते. या परिसरात महिला भाविकांचे दागिने, पर्स तसेच मोबाइल लांबवण्याचे प्रकार होतात. मध्य भागात साध्या वेशातील पोलिसांचे पथक गस्त घालणार आहे. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी महिला पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखेचे पथक तैनात करण्यात येणार आहे. 

  * तीस हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मागील तीन महिन्यांपासून शहरातील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी ह्यसीवॉचह्णयोजनेअंतर्गत व्यापाºयांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले होते.  या योजनेअंतर्गत शहरात खासगी सहभागातून तीस हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेºयांच्या माध्यमातून मध्य भागातील महत्त्वाच्या मंडळांच्या परिसरावर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. संशयित व्यक्ती तसेच बेवारस वस्तू आढळल्यास तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवPoliceपोलिस