शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

पोखरी घाटही धोकादायक, अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 01:11 IST

सुरक्षेची काळजी न घेतल्याने दापोली येथे भीषण अपघाताची घटना घडली. येऊ घातलेल्या भीमाशंकर यात्रेच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील पोखरी घाटाची पाहणी केली असता हा घाटही धोकादायक ठरू शकतो, असे चित्र आहे.

डिंभे : सुरक्षेची काळजी न घेतल्याने दापोली येथे भीषण अपघाताची घटना घडली. येऊ घातलेल्या भीमाशंकर यात्रेच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील पोखरी घाटाची पाहणी केली असता हा घाटही धोकादायक ठरू शकतो, असे चित्र आहे. पोखरी घाटातील अवघड वळणे व तीव्र उतार असून संरक्षक भिंतीची गरज आहे. अरुंद रस्ता व दिवसेंदिवस घाटातून वाढू लागलेली वाहतुकीची वर्दळ यामुळे हा घाटरस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. परंतु, याकडे सातत्याने दुर्लक्षच होत आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाट. श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाण्यासाठी मंचर-भीमाशंकर एकमेव मार्ग आहे. या रस्त्यावर डिंभे गावच्या पुढे जवळपास १० किलोमीटरवर घाट सुरू होतो. या संपूर्ण घाटात सात अवघड वळणे लागत असल्याने ‘सातमाळी’ घाट म्हणूनही त्याची ओळख आहे. या घाटातील वळणांवर अनेक ठिकाणी रस्त्याच्या वरच्या बाजू कमकुवत झाल्या आहेत. अनेकदा या घाटात पावसाळ्यामध्ये दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळा, श्रावण महिना, महाशिवरात्री, कोजागरी पौर्णिमा, दिवाळी व उन्हाळी सुट्यांच्या दरम्यानही या रस्त्यावर सतत वाहतुकीची वर्दळ असते.सुमारे ३५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात विशेष अशी सुधारणा झालेली नाही. अवघड वळणांवरील तीव्र उतार सध्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत. या घाटात अनेकदा छोटे-मोठे अपघात घडत असतात. अरुंद रस्त्यामुळे एसटी बस, लक्झरी बस यासारख्या मोठ्या वाहनांमुळे या घाटात अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होत आहे.घाटातील कमलजामाता मंदिराजवळ असणाऱ्या वळणावर एसटी बस व वारकºयांचा ट्रक उलटून मोठे अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. गोहे गावापासून माथ्यावरील राजेवाडी गावापर्यंत घाटास संरक्षक भिंत बांधण्याची अनेकदा मागणी करण्यात आली आहे. मात्र, याकडे आजपर्यंत दुर्लक्षच होत आहे. भीमाशंकर विकास आराखड्याप्रमाणेच या घाटातील रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही. या घाटातील धरण पॉर्इंटपासून पुढे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत.>ज्योतिर्लिंगांना जोडणारे रस्ते १० मीटरपर्यंत रूंद करून नॅशनल हायवे अंतर्गत घाट रस्त्याच्या कामास परवानगी मिळणार होती. मात्र अद्याप बांधकाम विभागाकडे कोणतीही परवानगी मिळाली नाही. सध्या घाटातील खड्डे भरणे, गटारे साफ करण आदी कामे बांधकाम विभागाकडून केली आहेत. रस्त्यावर बेअरींग उभी करणे खालच्या बाजूने वॉल कंपाऊंड बांधणे इत्यादी कामे करावी लागणार आहेत. दर तीन वर्षांनी घाट तस्त्याचे डांबरीकरण होणे गरजचे आहे. मात्र या घाट रस्त्यावर मोठ्या स्वरूपाची कामे होण्यासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.- एल. टी. डाके, उप अभियंता बांधकाम विभाग (घोडेगाव)

पोखरी घाटाच्या रुंदीकरणासह या घाटास संरक्षक भिंत बांधणे, अवघड वळणांवरील उतार कमी करण्यासाठी वारंवार शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. भीमाशंकरमुळे या रस्त्यावर सतत वर्दळ असते. मोठी वाहने पार होताना नेहमीच अडथळे निर्माण होतात. अनेकदा अपघातही झाले आहेत. एक-दोनदा भाविकांच्या लक्झरी बसचे गंंभीर अपघात होता-होता वाचले आहेत. या घाटरस्त्याला संरक्षक भिंत होणे अतिशय गरजेचे आहे.- मारुती भवारीपुणे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा