शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कवी हाच कवितेचा समीक्षक : हेमंत जोगळेकर; मसापमध्ये ‘एक कवी एक कवयित्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 15:56 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'एक कवी एक कवयित्री' या कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ कवी उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी ज्येष्ठ कवयित्री वृषाली किन्हाळकर आणि कवी हेमंत जोगळेकर यांच्याशी संवाद साधला.

ठळक मुद्देमसापमध्ये कवयित्री वृषाली किन्हाळकर आणि कवी हेमंत जोगळेकर यांच्याशी संवादविडंबन काव्य उत्स्फूर्त असावं : हेमंत जोगळेकर

पुणे : 'समीक्षकांनी कवितेची समीक्षा चांगली केली काय किंवा वाईट केली काय त्यामुळे कवीच्या मोठेपणात काहीच फरक पडत नाही. समीक्षकांना आवडेल असे लेखन करणारे कवी असतात. आम्ही मात्र नैसर्गिक कविता लिहीत असतो. मानधन किंवा मोबदल्यापेक्षा रसिकांचा आनंद महत्त्वाचा असतो. कवीला तोंडदेखली प्रतिष्ठा नको असते. कवींनी कवी कुळाला बट्टा लागेल असे वर्तन कधी करू नये. कवीची प्रतिष्ठा कवींनाच सांभाळावी लागते. कवी हाच कवितेचा खरा समीक्षक असतो.' असे मत प्रसिद्ध कवी हेमंत जोगळेकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'एक कवी एक कवयित्री' या कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ कवी उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी ज्येष्ठ कवयित्री वृषाली किन्हाळकर आणि कवी हेमंत जोगळेकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होते. हेमंत जोगळेकर म्हणाले, 'विडंबन काव्य उत्स्फूर्त असावं. कवींनी पूर्वसुरींच्या कविता वाचल्या पाहिजेत. विडंबनकार हा उत्तम कवी असायला हवा. मी मुळातला कवी आहे आणि नंतर अभियंता झालो. माझी कविता अशास्त्रीय नाही. स्पष्टपणा हाच कवींचा मूलभूत गुण असतो. मी गंभीर स्वभावाचा आहे पण माझी कविता मिश्किल आहे.'डॉ. वृषाली किन्हाळकर म्हणाल्या, 'आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी हेच माझं प्रेरणास्थान आहे. समाजातील गरीब स्त्रियांनी माज्या जाणीवा समृद्ध केल्या आहे. स्त्रीवर होणारा अन्याय, त्यांची तडफड, त्यांच्या वेदना आणि वास्तव माज्या संवेदनांना जागृत करतात.  दु:खांची पाळेमुळे शोधतांना चांगली कविता सापडते.  डॉक्टर असल्यामुळे मी स्त्री जन्माचा सोहळा रोज पाहते तसा तिच्या मृत्यूचा पाहावा लागतो. स्त्रीच्या वेदनेचा प्रभाव माझ्यावर आहे. बाईचं दु:ख मला खेचून घेतं. महिलांकडे आदरानं न पाहणं, राजकारणावर टीका करणं हे चुकीचे आहे. कवीचे मठ आणि  मठातलं राजकारण मला आवडत नाही. संवेदनांना त्रास झाला तरच चांगली कविता समोर येईल.'प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद आडकर यांनी आभार मानले.    

टॅग्स :MSP Mandalमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळPuneपुणे