शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

पीएमआरडीएने महापालिकेच्या कामांत ढवळाढवळ करू नये  : चेतन तुपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 21:46 IST

पुणेकरांचे हक्काचे पाणी पळविण्याचा जलसंपदा व पीएमआरडीएचा प्रयत्न आहे याविषयी तुपे यांनी पीएमआरडीएच्या कारभारावर ताशेरे ओढले.

ठळक मुद्देशहराच्या पाणी बचतीचा अहवाल मागविण्याचा अधिकार नाहीमहापालिकेच्या पाण्यात कपात करून हे पाणी पीएमआरडीएला देण्याचा शासनाच्या जलसंपदा विभागाचा घाट

पुणे: शासनाच्या जलसंपदा विभागाने महापालिकेकडून बचत होणार पाणी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातील गावांना देण्यात येईल, असे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएने पुणे महापालिकेला लेखी पत्र पाठवून शहरातील पाणी बचतीचा अहवाल मागविला आहे. पीएमआरडीएला अशा प्रकारे महापालिकेकडे अहवाल मागविण्याचा कोणातही अधिकार नाही. त्यांनी आपल्या हद्दीत सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामे, डीपी स्किमचा बोगस कारभाराकडे लक्ष द्यावे, महापालिकेच्या कामांत ढवळाढवळ करून नये, असा इशारा महापालिकेचे विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांनी पत्रकार परिषदेत दिला.महापालिकेच्या वाट्याच्या पाण्यात कपात करून हे पाणी पीएमआरडीएला देण्याचा घाट शासनाच्या जलसंपदा विभागाने घातला आहे.याबाबत तुपे यांनी पत्रकार परिषद घेऊन पीएमआरडीएच्या कारभारावर ताशोरे ओढले. महापालिका शहरासाठी किती पाणी वाहते, किती पाण्याची गळती होते व किती पाण्याची बचत केली जाते अशी माहिती पीएमआरडीएने लेखी पत्र देऊन महापालिकेकडे मागितली आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यात महापालिकेच्या कारभारामध्ये पीएमआरडीएची ढवळाढवळ सुरु आहे. मेट्रो असो की आता पाणी वापर महापालिकेच्या अधिकारांवर गद्दा आणण्याचे काम सुरु आहे. परंतु, गेल्या काही महिन्यात पीएमआरडीएच्या हद्दीत प्रचंड मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. अशी बांधकामे करणा-यांना नोटीसा देखील देण्यात येतात. मात्र, नोटिसा आल्यानंतर कोणत्याही स्वरुपाची कारवाई केली जात नाही. त्यामुळे या नोटिसा नक्की कशासाठी दिल्या जातात, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे महापालिकेकडे पाणी बचतीचा अहवाल मागविणा-या पीएमआरडीएने प्रथम आपल्या गलथान कारभाराचा अहवाल जनतेसमोर ठेवावा अशी मागणी देखील तुपे यांनी केली.----------------------योजना पूर्णत्वास असताना पाण्याचे आरक्षण रद्दभामा-आसखडे धरणातून पुणे शहराच्या पूर्वीभागाला पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे अडीच टीएमसी पाण्याचे आरक्षण निश्चित केले आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु असून, अनेक अडथळ्यानंतर हे काम सध्या पूर्णत्वासकडे आले आहे. असे असताना शासनाने आता भामा-आसखेड धरणातील महापालिकेचे पाणी आरक्षण रद्द केले आहे. ही अत्यंत खेदाची बाब असून, त्वरीत आरक्षण निश्चित करण्याची मागणी तुपे यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाChetan Tupeचेतन तुपेPMRDAपीएमआरडीए