शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

घुसखोरांवर ‘पीएमपी’ची कारवाई; २५ वाहनांवर दंडात्मक तर ५ वाहनांवर जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 03:21 IST

बीआरटी मार्गात होणारी खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाईला सुरूवात केली आहे. शुक्रवारी येरवडा ते वाघोली या मार्गावर रात्री २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

पुणे : बीआरटी मार्गात होणारी खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाईला सुरूवात केली आहे. शुक्रवारी येरवडा ते वाघोली या मार्गावर रात्री २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ५ वाहने जप्तही करण्यात आली आहेत. सोमवारपासून सर्व बीआरटी मार्गांवर घुसखोरी करणारी खासगी तसेच शासकीय वाहनांवरही थेट जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती ‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिली.प्रवाशांना जलद, सुलभ व सुरक्षित सार्वजनिक बस सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतून बीआरटी मार्ग सुरू करण्यात आले आहेत. या मार्गावर बसेससह केवळ रुग्णावाहिकांची ये-जा अपेक्षित आहे. मात्र, या मार्गांवर खासगी वाहनेही सर्रासपणे घुसखोरी करतात. त्यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. पीएमपीने ही घुसखोरी रोखण्यासाठी वॉर्डनचीही नियुक्ती केली. त्यांना न जुमानता तसेच शिवीगाळ, धक्काबुक्की करून वाहने मार्गावरून नेली जातात. याची गंभीरपणे दखल घेत मुंढे यांनी घुसखोरी करणाºया वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतुक पोलिसांच्या मदतीने संबंधित वाहनांवर दंडात्मक तसेच जप्तीची कारवाई करण्याचे त्यांनी काही दिवसांपुर्वीच स्पष्ट केले होते. यापार्श्वभुमीवर शुक्रवारपासून कारवाईला सुरूवात करण्यात आली.याविषयी माहिती देताना मुंढे म्हणाले, येरवडा ते वाघोली या मार्गावर शुक्रवारी रात्री ८ ते ९.४५ या वेळेत घुसखोरी करणाºया वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईअंतर्गत २० दुचाकी व ५ चारचाकी अशा एकूण २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये २ चारचाकी वाहने शासकीय आहेत. तसेच पाच वाहने जप्तही करण्यात आली. तसेच सोमवारपासून प्रत्येक बीआरटी मार्गावर कठोरपणे कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार खासगी वाहनांसह शासकीय वाहनांवरही जप्तीची कारवाई केली जाणार आहे. जप्त वाहनांचा नंतर लिलाव केला जाईल.नवीन दापोडी व निगडी बीआरटी मार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. बसेसची चाचणीही घेण्यात आली असून काही त्रुटी दूर केल्या जात आहेत. सुरक्षिततेबाबत तडजोड न करता आणखी काही त्रुटी असल्यास त्या दूर केल्या जातील.याबाबत पालिका प्रशासनासोबत समन्वय साधला जात आहे. मार्ग तयार झाल्यानंतर बससेवा सुरू केली जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी या मार्गाला विरोध केला आहे.

टॅग्स :Puneपुणे