शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीएमएलने बसपास दरवाढ रद्द करावी; प्रवासी मेळाव्यात विवेक वेलणकर यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 12:21 IST

पीएमपीने अनधिकृतरीत्या केलेली बसपास दरवाढ  तत्काळ रद्द करून सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा, असे मत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपीएमपी बसपास दरवाढविरोधी स्वाक्षरी मोहीम आढावा व प्रवासी मेळावाविविध अकरा संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित

पुणे : पीएमपीने अनधिकृतरीत्या केलेली बसपास दरवाढ  तत्काळ रद्द करून सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा, असे मत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले. पीएमपी बसपास दरवाढविरोधी स्वाक्षरी मोहीम आढावा व प्रवासी मेळाव्यात ते बोलत होते. वेलणकर म्हणाले की, पीएमपी प्रशासनाने केलेली बसपास दरवाढ ही नियमाला धरून नाही. प्रशासनाचा हा निर्णय तुघलकी कारभाराचा नमुना आहे. हा दरवाढीचा प्रस्ताव महापालिका सभागृहात जेव्हा मांडला गेला, त्या वेळी कोणत्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध केला नाही. पीएमपीच्या संचालक मंडळात सत्ताधारी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, एक प्रतिनिधी भाजपाचे आहेत. मात्र त्यांनीही या प्रस्तावाला विरोध केला नाही. यातून सत्ताधाऱ्यांची दुटप्पी भूमिका दिसून येते. या दरवाढीचा सर्वाधिक फटका ज्या लोकांचे हातावर पोट आहे असे मोलमजुरी करणाऱ्यांना व गरीब विद्यार्थ्यांना बसला आहे. याप्रकरणी नगरसेवकांना विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे देऊन मुख्य मुद्द्याला बगल देतात. पंचिंग पास बंद करण्याचे कारण देताना प्रशासन म्हणते, की तो इतर कुठेच चालत नसल्याने बंद करण्यात आला असे हास्यास्पद कारण दिले जाते. या दरवाढीला पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढेच जबाबदार नसून याप्रकरणात बघ्याची भूमिका घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांसह, विरोधी नगरसेवकही तितकेच जबाबदार आहेत.  सजग नागरिक मंच, लोकायत, जनवादी महिला संघ, भगतसिंग युवा मंच, जाणीव संघटना, नागरी चेतना या संघटनांसह विविध अकरा संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. लोकायतचे निश्चय म्हात्रे यांनी सांगितले, पीएमपी प्रवासी मंचातर्फे मागील पंधरा दिवसांत या बसपास दरवाढीविरोधात शहराच्या विविध भागांतून नागरिकांच्या सह्यांचे १० हजार फॉर्म जमा केले गेले. अजूनही ही मोहीम चालू असणार आहे. येत्या काळात एक लाख सह्यांचे फॉर्म पीएमपीच्या प्रशासनाला सादर करून प्रवाशांचा विरोध दाखवून देऊ. प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढावा व ही दरवाढ बंद करून पूर्वीचे पासदर ठेवावे. अन्यथा येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. शहराच्या महत्त्वाच्या मार्गावरील बससेवा मोफत देऊ असे महापालिका निवडणूक जाहीरनाम्यात सांगणारे सत्ताधारी आता सोईस्करपणे आपल्याच वचनाकडे दुर्लक्ष करतात असे ते म्हणाले.  

टॅग्स :Puneपुणे