शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीएमएलच्या १० कर्मचाऱ्यांची पदोन्नती रद्द; तुकाराम मुंढे यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 13:35 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) निर्मितीनंतर काही कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांसाठी हंगामी बढती दिली होती. ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी या सर्वांच्या बढत्या रद्द करून त्यांना मूळ पदावर रूजु होण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देतुकाराम मुंढे यांनी या सर्वांच्या बढत्या रद्द करून त्यांना मूळ पदावर रूजू होण्याचे दिले आदेश १८ पैकी १० कर्मचाऱ्यांची नियुक्ती नवीन आस्थापना आराखड्यानुसार निर्मिती करण्यात आलेल्या पदावर

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) निर्मितीनंतर काही कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांसाठी हंगामी बढती दिली होती. मात्र, प्रशासकीय आराखड अंतिम झालेला नसताना या कर्मचाऱ्यांना संबंधित पदांवर कायम केले होते. ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी या सर्वांच्या बढत्या रद्द करून त्यांना मूळ पदावर रूजु होण्याचे आदेश दिले आहेत.पीएमपी व पीसीएमटी एकत्रीकरण करून पीएमपी ही कंपनी अस्तित्वात आली. एकत्रिकरणाच्या पार्श्वभूमीवर २००७ नवीन पद निर्मिती व सुधारीत वेतनश्रेणी लागु करण्याबाबत संचालक मंडळामध्ये चर्चा झाली होती. या पदांवर त्यावेळी विविध पदांवर असलेल्या सुमारे १८ कर्मचाऱ्यांची नेमणूक पुढील सहा महिन्यांसाठी हंगामी स्वरूपात करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर प्रशासकीय आराखडा अंतिम झालेला नसतानाही २००८ मध्ये संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना त्याच पदावर सुधारीत वेतनश्रेणीसह कायम करण्याचा निर्णय घेतला. याबाबत पीएमपीतील राष्ट्रवादी कामगार युनियनने सातत्याने पाठपुरावा केला. मुंढे यांची नियुक्ती पीएमपीमध्ये झाल्यानंतरही त्यांना याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार मुंढे यांनी सर्व तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना मुळ पदावर निुयक्ती देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. एकूण १८ कर्मचाऱ्यांपैकी शुक्रवारी १० कर्मचाऱ्यांची नियुक्ती नवीन आस्थापना आराखड्यानुसार निर्मिती करण्यात आलेल्या पदावर केली आहे. त्यांना पुर्वी बढती देण्यात आलेल्या पदाच्या वेतनश्रेणीऐवजी नवीन पदाची वेतनश्रेणी दिली जाईल. 

पदोन्नती रद्द करण्यात आलेले कर्मचारी व सुधारित पद (कंसात २००७ मध्ये पदोन्नतीने मिळालेले पद) : प्रशांत कोळेकर - लिपिक (कनिष्ठ अभियंता - विद्युत), विक्रम शितोळे - वाहतुक निरीक्षक (पास विभाग प्रमुख), शिरीष कालेकर - हेड मेकॅनिक (व्यवस्थापकांचे स्वीय सहायक), असिफ अब्बास झारी - लिपिक (अध्यक्षांचे स्वीय सहायक), दत्तात्रय तुळपुळे - लिपिक (कनिष्ठ अभियंता - स्थापत्य), नितीन वांबुरे - लिपिक (स्वच्छता विभागप्रमुख), शांताराम वाघेरे - पुणे स्टेशन आगार कार्यालय अधिक्षक (स्वीय सहायक संचालक मंडळ), अरूण थोपटे - स्थापत्य पर्यवेक्षक (मेंटनन्स सुपरवायझर), मधुकर गायकवाड - मराठी लघुलेखक (मराठी स्टेनोग्राफर), बापु मोरे - टेलिफोन विभागप्रमुख (वरिष्ठ लिपिक)

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड