शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी तिकीट दरवाढीचा प्रवासी संघटनाकडून तीव्र विरोध; पीएमपीएल प्रवासी मंचचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 08:54 IST

प्रवासी संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पुणे :पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचे मुख्य साधन असलेल्या पीएमपी बसच्या तिकीट दरवाढीचा विचार महापालिकेने केल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रवासी संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.पीएमपी प्रशासनाने त्रुटीतून बाहेर पडण्यासाठी हा निर्णय घ्यायचा विचार केला असला, तरी प्रवाशांसाठी हा अन्यायकारक आहे. पुण्यात दररोज सुमारे १० लाखांपेक्षा जास्त प्रवासी पीएमपी बसने प्रवास करतात. पीएमपी बस ही सर्वसामान्यांसाठी परवडणारी सेवा असल्याने लाखो लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे. प्रवासी संघटनांच्या मते, ही दरवाढ केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी केली जात असल्याचे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.२०१७ च्या आंदोलनाची आठवण २०१७ साली पीएमपीच्या तिकीट दरवाढीविरोधात प्रवाशांनी मोठे आंदोलन केले होते. बसथांब्यावर फलक लावत आणि रस्त्यावर उतरून त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. आता पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.तिकीट दरवाढ नको, सेवा सुधारणा हवी प्रवाशांच्या मते, पीएमपी प्रशासनाने सेवा सुधारण्यावर भर द्यावा. वेळापत्रक नियमित पाळणे, सुरक्षित प्रवासाची हमी देणे आणि बसेसची संख्या वाढवणे हे उपाय यावर पर्याय ठरू शकतात. दरवाढ करून प्रवाशांवर अतिरिक्त भार टाकण्यापेक्षा राज्य शासनाने पीएमपीला अधिक निधी द्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.त्रुटीचे कारण काय?पीएमपी प्रशासनाला यंदा ७०६ कोटींहून अधिक तोटा सहन करावा लागला आहे. कोरोनाच्या काळातील महसुली घट आणि व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे पीएमपी तोट्यात आहे. महापालिकेच्या हद्दीबाहेरही सेवा पुरवताना झालेला खर्च हा मोठ्या त्रुटीचे कारण ठरत आहे. 

प्रशासनाकडून प्रतिक्रिया अद्याप प्रलंबितप्रवाशांच्या तीव्र विरोधानंतरही अद्याप पीएमपी संचालक मंडळाने तिकीट दरवाढीचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र, यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेने तिकीट दरवाढीऐवजी प्रवासी केंद्रित धोरण आखून पीएमपीच्या आर्थिक अडचणींवर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिक आणि प्रवासी संघटनांनी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला जात आहे. महापालिकेच्या पुढील भूमिकेकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. प्रवाशांना लक्ष्य करण्याऐवजी महापालिकेने पीएमपीच्या तोट्याचे कारण शोधून योग्य उपाययोजना कराव्यात. प्रवाशांना महागाईच्या खाईत ढकलले जात आहे. याला आमचा तीव्र विरोध आहे. - जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड