शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या तिकिट मशीनचे ब्रेक डाऊन : प्रवासी वैतागले, वाहक हतबल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 21:32 IST

विविध कारणांमुळे या मशिन मार्गातच बंद पडत असल्याने वाहकांची डोकेदुखी वाढली आहे.

पुणे : पीएमपीच्या ताफ्यातील बस रस्त्यातच बंद पडल्याचे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामध्ये आता ई-तिकीटींग मशीनच्या ब्रेकडाऊनची भर पडली आहे. विविध कारणांमुळे या मशिन मार्गातच बंद पडत असल्याने वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच त्यामुळे पीएमपीचे आर्थिक नुकसानही होत असल्याचे समोर आले आहे. 

देशात पहिल्यांदा पीएमपीने बसमध्ये ई-तिकीटींगला सुरूवात केली. या प्रक्रियेत पारदर्शकता यावी, वाहकांवरील ताण कमी व्हावा या उद्देशाने ई-तिकीटींगला पसंती देण्यात आली. पीएमपी प्रशासनाला त्याचा फायदाही झाला. पण या मशिन तांत्रिक बिघाडामुळे पीएमपीला फटकाही बसत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी रात्री मनपा ते माळवाडी मार्गावरील बसमध्ये जाणाºया प्रवाशांना आला. बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. प्रवासी तिकिट काढण्यासाठी वाहकाला पैसे देत असतांनाच तिकिट मशीन बंद पडली.  प्रवासी वाहकाकडे तिकिटची मागणी करत होते. वाहक देखील तिकिट काढण्याचा प्रयत्न करत होता. परंतु मशीनमधून तिकिट येत नव्हते. मशीन बिघडल्याने बस थांब्यावर थांबल्यानंतर नवीन प्रवाशांनी चढू नये असे वाहक सांगत होता. त्यानंतर बस कोथरूड येथील गांधी भवन थांब्यावर थांबवण्यात आली. तेथे दुसरी मशीन मागवण्यात आली. त्यानंतर प्रवाशांना तिकिटे देण्यात आली. पण त्यापुर्वी तिकीट न घेताच काही प्रवासी बसमधून उतरले. 

असाच अनुभव प्रवाशांना अनेकदा येत आहे. मशीन अचानक बंद पडणे, वारंवार चार्जिंग उतरणे, अक्षरे अस्पष्ट असणे, तिकिट अर्धवट निघणे, तिकीट निघण्यास उशीर होणे, अशा प्रकारांत वाढ झाली आहे. यातून पीएमपीला आर्थिक नुकसान देखील होत आहे. ई तिकिट मशीनच्या या अडचणींमुळे अनेक वाहक त्रस्त  झाले आहेत.  प्रवासी आणि वाहक यांच्यात अनेकदा वाद होण्याच्या घटना घडतात. चार्जिंग उतरल्यावर गाडीमध्ये कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे वाहकांना  स्वत:ची पावरबँक सोबत ठेवावी लागत आहे. मशीन बंद पडल्यावर वाहकांनी पूर्वीच्या ट्रे पद्धतीचा आधार हाताशी ठेवणे आवश्यक आहे. वाहकांना नव्या मशीन उपलब्ध करणे किंवा त्यांना ट्रे सोबत ठेवण्याची सक्ती करण्याबाबत पीएमपी  प्रशासनाने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलTrafficवाहतूक कोंडीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स