पुणे : पीएमपी प्रशासनाने प्रवाशांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या. त्या प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे हवेतच विरल्या आहेत, अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे. प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन पीएमपीएमएल प्रशासनाने नामफलकाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या योजनांमध्ये झेब्रा क्रॉसिंंगवर बस दाखवा एक हजार रुपये मिळवा, नामफलक नसलेली बस दाखवा शंभर रुपये मिळवा, भ्रमणध्वनीवर बोलणारा चालक दाखवा, हात दाखवा बस थांबवा, सुखरूप प्रवास पीएमपीचा, ध्वनिवर्धक घेऊन पीएमपी प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी बसथांब्यावर थांबलेले पाहायला मिळत होते, अशा अनेक योजना प्रवाशांसाठी राबविल्या. त्यामधील नामफलक ही अत्यंत महत्त्वाची योजना होती. बस कुठे जाते याची माहिती बसथांब्यावरील प्रवाशांना चटकन समजत होती. बसवर नामफलक नसेल तर बस कुठे जाते, हे विचारेपर्यंत बस निघून जाते आणि पुन्हा दुसर्या बसची वाट पाहावी लागते. त्यामुळे बाहेरगावाहून आलेले प्रवासी गोंधळून जातात. अनेक बसवर नामफलक नसतो, तर काही बसवर अर्धवट अवस्थेत असतो. रात्रीच्या वेळी नामफलकावर विजेची सुविधा असतानाही वाहनचालकाच्या आडमुठेपणामुळे दिवा लावला जात नाही व नामफलक प्रवाशांना दिसत नाहीत. (प्रतिनिधी) धोकादायक भुयारी मार्ग पुणे : बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोरील तसेच पुणे रेल्वे स्थानिकासमोरील भुयारी मार्ग सध्या धोकादायक बनले असून, या भुयारी मार्गाच्या देखभालीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या रस्त्यांवरून जाणार्या पादचार्यांना सुरक्षित प्रवास करता यावा आणि रस्ता ओलांडताना होणार्या संभाव्य अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने संबंधित ठिकाणी पादचारी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहे. मात्र, सध्या या दोन्ही भुयारी मार्गांची स्थिती वाईट झाली आहे. (प्रतिनिधी)
पीएमपी धावते नामफलकांविना
By admin | Updated: May 20, 2014 23:56 IST