शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

पीएमपी प्रवासीसंख्येत घट

By admin | Updated: October 11, 2015 04:39 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) प्रतिबस प्रवासीसंख्येत या वर्षीही तूट येत असल्याचे चित्र आहे.

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) प्रतिबस प्रवासीसंख्येत या वर्षीही तूट येत असल्याचे चित्र आहे. जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत ही सरासरी ७७० प्रवासी इतकी खाली पोहोचली आहे. सन २०१४ मध्ये प्रतिबस प्रवासीसंख्या ८५० तर २०१३ मध्ये ती ९०० इतकी होती. या वर्षी संचलनात अधिक बस असूनही पीएमपीकडून वाढविण्यात आलेल्या तिकीटदरामुळे पीएमपीचे उत्पन्न वाढले असले, तरी प्रतिबस प्रवाशांची संख्या ७० ते ८० ने घटली आहे.पीएमपीच्या ताफ्यात जवळपास दोन हजार बस आहेत. त्यात ६६३ बस या खासगी कंपन्यांच्या असून, त्या भाडेकराराने घेण्यात आलेल्या आहेत. मात्र, एवढ्या बस असूनही पीएमपीच्या दरदिवशी सरासरी १५०० बसच संचलनात असतात. बस वाढवून आणि मार्गांची फेररचना करूनही जानेवारी ते आॅगस्ट २०१५ या पहिल्या सहा महिन्यांत प्रतिबस प्रवासीसंख्या ७७० पर्यंत खाली आली आहे. जानेवारी २०१५ मध्ये हीच संख्या सरासरी ८९० होती. मात्र, आॅगस्टअखेर ती जवळपास १२० ने कमी झाली असल्याचे दिसून येते. यावरून पीएमपीच्या ढिसाळ कारभाराला वैतागून प्रवासी पीएमपीकडे पाठ करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.ठेकेदारांच्या बसमधील प्रवासीसंख्या घटली?पीएमपीकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या ठेकेदारांच्या बसचे प्रवासी प्रामुख्याने घटल्याचे चित्र आहे. या बसबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी असून, या सर्व बस पीएमपीकडून शहराबाहेर फिरविल्या जातात. या बस वेळेवर तसेच थांब्यावर थांबत नसल्याच्या मोठ्या तक्रारी पीएमपी प्रशासनाकडे आहेत. ठेकेदारांच्या बसला दररोज सरासरी २०० किमी संचलनाचे काम देण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना प्रतिकिलोमीटर दरही ठरवून देण्यात आलेला आहे. मात्र, एका बसमागे किती उत्पन्न असावे व किती प्रवासीसंख्या असावी, असे कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवासी असो अथवा नसो या वाहनांचे संचलन नियमित सुरूच आहे. तसेच त्यांना मिळणारा प्रतिकिमी निधीही वेळेवर दिला जात आहे.पीएमपीने या वर्षी १२ लाखांचा प्रवासी आकडा गाठला आहे. हा आकडा गाठण्यासाठी पीएमपीला मार्गावर १ हजाराहून अधिक बस उतराव्या लागल्या होत्या. २०१४ मध्ये मार्गावर १ हजार बस असूनही प्रतिबस प्रवासीसंख्या ही ८५० होती, तर २०१३ मध्ये मार्गावर ८०० बस असूनही ही संख्या ९०० होती. आता हा आकडा मार्गावर संचलनात असलेल्या बसचे प्रमाण पाहता वाढणे अपेक्षित होते. असे न होता रस्त्यावर १५०० बस असूनही हा आकडा प्रतिबस ७७० वर पोहोचला आहे. प्रशासनाकडून प्रवासीसंख्येपेक्षा उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जात असला तरी, उत्पन्न वाढण्यामागे पीएमपीकडून इतर खर्चात केलेली बचत तसेच तिकीटदर आणि पासच्या किमतीमध्ये वाढविण्यात आलेल्या रकमेमुळे भर पडली असल्याचे यावरून दिसून येते.पीएमपीकडून केवळ तिकीट वाढवून उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रवासीसंख्या घटताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्यक्षात प्रवासीसंख्या घट खासगी ठेकेदारांच्या बसमुळे आहे. त्याबाबतच्या शेकडो तक्रारी प्रवाशांनी केलेल्या आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बससेवा प्रवासीकेंद्रित होणे आवश्यक आहे. - जुगल राठी (अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच)