शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पीएमपी नीट चालणार आहे की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 02:44 IST

आरटीई अंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळांवर प्रशासक नेमण्याचे शिक्षण संचालकांनी दिलेले आदेश कागदावरच राहिले आहेत.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील आरटीईच्या पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास ८६ शाळांनी नकार दिला असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश न देणाऱ्या शाळांवर प्रशासक नेमण्याचे शिक्षण संचालकांनी दिलेले आदेश कागदावरच राहिले आहेत. शाळांच्या या मनमानी कारभारामुळे आरटीईच्या दुसºया फेरीची सोडत अद्यापही निघू शकलेली नाही.राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आरटीईच्या दुसºया फेरीतील प्रवेश शनिवारी जाहीर करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील आरटीईच्या दुसºया फेरीचे प्रवेश मात्र शनिवारी जाहीर झाले नाहीत. त्यामुळे दुसºया फेरीचे प्रवेश कधी जाहीर होणार, याची विचारणा पालकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८६ शाळांनी आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिल्याने पेच निर्माण झाला आहे. आरटीईची पुढील फेरी राबविण्यापूर्वी या शाळेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. त्यानंतरच दुसºया फेरीची सोडत जाहीर करता येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याची दुसºया फेरीची सोडत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.राज्यातील ४१ इंग्रजी माध्यमाच्या शाळा उच्च न्यायालयात गेल्या आहेत. फक्त त्या शाळांमधील आरटीईच्या प्रवेशाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त तब्बल ८६ शाळांनी आरटीईचे प्रवेश नाकारले आहेत. त्यामुळे या शाळेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारल्यास त्या शाळांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने १५ आॅक्टोबर २०१२ रोजी घेतला आहे. त्यानुसार महाराष्टÑ शैक्षणिक संस्था (व्यवस्थापन अधिनियम) १९७६ अन्वये प्रशासक नियुक्ती करण्याची कार्यवाही राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक), प्रशासन अधिकारी, शिक्षण निरीक्षक (दक्षिण, उत्तर व पश्चिम मुंबई) यांनी करावी असे आदेश सुनील चौहान यांनीकाढले आहेत. मात्र त्यानुसार कार्यवाही करण्याचे धाडस शिक्षण विभागाकडून दाखविले जात नसल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांचे दाखले घरी पाठविलेशिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची रक्कम शासनाकडून मिळाली नसल्याचे स्पष्ट करून आरटीई अंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल व शाळा सोडल्याचा दाखला परस्पर घरी पाठवून देण्यात आल्याचा प्रकार सांगवीतील नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये घडला आहे. या शाळेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे केली आहे. तक्रारीची समितीमार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे शिक्षण आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या शाळेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच त्यांची बालहक्क आयोगाकडे तक्रार करावी, अशी मागणी डॉ. सिद्धार्थ धेंडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली. आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क शाळेला घेता येत नाही. मात्र, तरीही शाळेकडून पहिलीत प्रवेश घेताना ६ हजार तर दुसरीतील प्रवेशासाठी १२ हजार रुपयांचीमागणी केली जात आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात इतर मुलांपासून वेगळे बसविले जाते. शाळेतील स्नेहसंमेलन व इतर कार्यक्रमांत त्यांना सहभागी करून घेतले जात नाही. विद्यार्थ्यांनी सोडवलेले पेपर व निकालपालकांना दाखविला जात नाही. आरटीईच्या विद्यार्थ्यांच्या शुल्काचेपैसे शासनाकडून मिळाले नसल्याने पालकांनी ते शुल्क भरावे, असा त्यांना निरोप देण्यात आला.

टॅग्स :educationशैक्षणिक