शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीचा उडाला भडका; कोथरुड डेपोतील प्रकार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 11:35 IST

पीएमपीएमएलच्या कोथरूडमधील बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या सीएनजी बसने आज (शनिवार, दि. १६) अचानक पेट घेतला. यात पूर्ण बस जळून खाक झाली.

ठळक मुद्दे डेपो व्यवस्थापक आणि चालकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक यंत्राचा केला वापर पूर्ण बस जळून खाक, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता

पुणे : पीएमपीएमएलच्या कोथरूडमधील बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या सीएनजी बसने आज (शनिवार, दि. १६) अचानक पेट घेतला. यात पूर्ण बस जळून खाक झाली असून, चालकांनी इतर बस त्वरित घटनास्थळावरून हटवल्याने इतर बस सुरक्षित राहिल्या. यावेळी डेपो मधील अग्निशामक यंत्राच्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालकांकडून केला गेला, मात्र आगीचे प्रमाण मोठे असल्याने त्यांना यश आले नाही.याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वासात वाजता कोथरूड डेपोमध्ये पार्क केलेली पीएमपीएमएल बस क्र. एमएच १२ एचबी १०२० ला मार्गावर काढण्यापूर्वी बंद अवस्थेत असतानाच अचानक आग लागली. यावेळी डेपो व्यवस्थापक आणि चालकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक यंत्राचा वापर केला. मात्र बस सीएनजी गॅसवर चालणारी असल्याने बसचा भडका उडाला.दरम्यान अग्निशामक दलाला याबाबत कळवण्यात आले होते. यावेळी दाखल झालेल्या कोथरूड अग्निशामक दलाचे स्टेशन अधिकारी गजानन पाथ्रूडकर, अग्निशामक जवान पंढरीनाथ उभे, चालक शरद गोडसे यांच्या पथकाने तातडीने पाण्याचा मारा करून अवघ्या दोन मिनिटांत आग आटोक्यात आणली. मात्र आगीचे प्रमाण एवढे मोठे होते, की पूर्ण बस जळून खाक झाली.

बसच्या इंजिन बाजूने आग लागल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले. तर शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलfire brigade puneपुणे अग्निशामक दल