पुणो : पीएमपीची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तिकीट दरवाढीसंदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा होणार होती. नव्या आर्थिक वर्षातील दुसरी बैठक बुधवारी (दि.25) आयोजित करण्यात आली होती. परंतु, मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एलबीटीबाबत बैठक बोलावल्याने दोन्ही महापौर आणि पदाधिका:यांना जावे लागले. त्यामुळे आयसीयूमध्ये असलेल्या पीएमपीबाबत निर्णय घेणा:या संचालक मंडळाची बैठक पुढे ढकलण्यात आली.
पुढे ढकलण्यात आलेली सभा शुक्रवारी (दि.27) होणार आहे. पीएमपीच्या सुमारे 5क्क् बस बंद, कर्मचा:यांचे पगार देण्यास पैसे नाहीत, अशा परिस्थितीत पीएमपी जगू द्यायची असेल, तर तिकीट दरवाढ करा किंवा दोन्ही महापालिकांनी देणी द्या, असे दोनच पर्याय शिल्लक आहेत. डिङोल व सीएनजी दरवाढीमुळे आणि आस्थापना खर्चातील वाढीमुळे तिकीट दरवाढ करण्याबाबत मागील सभेमध्ये चर्चा झाली होती. परंतु, त्यावरील निर्णय न झाल्याने हा विषय पुढे ढकलण्यात आला होता.
दोन्ही महापालिकांकडून पीएमपीला सुमारे 185 कोटी रुपयांची येणी आहेत. ही येणी दर महिन्याला टप्प्याटप्प्याने मिळाल्यास तिकीट दरवाढ करण्याची वेळ येणार नाही. याशिवाय दर महिन्याला होणारा सुमारे 16 कोटी रुपयांचा तोटा 8 कोटी रुपयांवर येईल. त्यामुळे पैसे मिळावे, याकरिता पाठपुरावा करण्याचे काम प्रशासन करीत आहे.(प्रतिनिधी)