शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वारीसाठी पीएमपीच्या अतिरिक्त बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 20:42 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी साेहळ्यासाठी पुणे परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) अतिरिक्त बसेसची साेय उपलब्ध करुन देण्यात येणार अाहे.

पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी साेहळ्यासाठी पुणे परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) अतिरिक्त बसेसची साेय उपलब्ध करुन देण्यात येणार अाहे. 3 जुलै ते 7 जुलै दरम्यान शहरातील विविध स्थानकांमधून अाळंदीकडे जाण्यासाठी 110 बसेस साेडण्यात येणार अाहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या वारकऱ्यांना अाळंदीला जाणे साेयिचे हाेणार अाहे.        पालखी प्रस्थानासाठी हजारो भाविक पुण्याहून आळंदीकडे प्रवास करतात. त्यांना वेळेत बस उपलब्ध करून देण्यासाठी पीएमपीएल प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे २० अतिरिक्त बसचे नियोजन केले आहे. तसेच प्रस्थानाआधी ६ जुलैला रात्री बारा वाजेपर्यंत बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तर श्री क्षेत्र देहूकडे जाण्यासाठी पुणे स्टेशन, महानगरपालिका,  निगडी ठिकाणावरून संचलनात असणार्‍या २० बसेस महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा १९ बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणर्‍या बसेस सकाळी साडेपाच वाजल्यापासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील भाविकांसाठी  सुरु हाेणार आहेत. तसेच पुण्याहून पंढरीच्या दिशेने पालखी निघताना ९ जुलैला  हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी थांबणार असल्याने, या वेळेस महात्मा गांधी स्थानकाजवळ पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, कोथरुड डेपो, निगडी, आळंदी  ठिकाणी जाण्यासाठी बससेवेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

    दोन्ही पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रस्त्याने मार्गस्थ होणार असल्याने  सोलापूर-उरुळीकांचन मार्ग जसजसा वाहतुकीसाठी खुला होईल, तशी बसवाहतुक सुरु ठेवण्यात येणार आहे. हडपसर ते सासवड दरम्याचा दिवेघाट रस्ता वाहतुकीस पुर्णतः बंद राहणार आहे. दरम्यान, प्रवासी भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी या मार्गाची बसवाहतूक दिवेघाट ऐवजी बोपदेव घाटमार्गे अशी सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून, ६० जादा बसेसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पीएमपीएल प्रशासनाने दिली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलPandharpurपंढरपूरAlandiआळंदी