शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील बिगारी लाच घेताना जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 18:30 IST

बांधकामाचा नियमितीकरणाचा दाखला प्रमाणित करून देण्यासाठी व बांधकाम परवानगी नकाशाची नक्कल देण्यासाठी  वीस हजार रुपयांची लाच स्विकारताना पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विभागातील बिगारी सुपरवायजरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. 

ठळक मुद्देबांधकाम परवानगी नकाशाची नक्कलेसाठी मागितले २० हजार

पुणे : बांधकामाचा नियमितीकरणाचा दाखला प्रमाणित करून देण्यासाठी व बांधकाम परवानगी नकाशाची नक्कल देण्यासाठी  वीस हजार रुपयांची लाच स्विकारताना पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विभागातील बिगारी सुपरवायजरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. 

      गोपीचंद दत्तात्रय पठारे (वय ४५, रा़ बिगारी, सुपरवायजर. बांधकाम विभाग पुणे महानगर पालिका) असे त्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्या काकांनी सह्याद्री पार्क सोसायटीत २००४ साली केलेल्या बांधकामाचा नियमितीकरणाचा दाखला प्रमाणित करून देण्यासाठी व बांधकाम परवानगी नकाशाची नक्कल मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यावेळी बिगारी पठारे यांनी त्यांच्याकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने याची पडताळणी केल्यावर त्याने तडजोडीअंती २० हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुरुवारी पथकाने शिवाजीनगर गावठाण येथील दिलीप टी येथे सापळा रचला़ पठारे यांना तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महापालिका मुख्यालय बिगाऱ्यांच्या ताब्यातमहापालिकेच्या मुख्य इमारतीमधील जवळपास प्रत्येक खात्यातील साहेबांची व पदाधिकाऱ्यांच्या दालनातील प्रमुख कामे बिगाऱ्यांच्याकडून केली जात आहेत. ही कामे करणारे मूळ कारकून व कर्मचारी आवारातील हॉटेलांमध्ये व हे बिगारी त्यांच्या टेबलवर अशी स्थिती सध्या महापालिकेतील बहुसंख्य खात्यांच्या कार्यालयांमध्ये आहे. महापालिकेच्या कायम सेवेत असलेल्या या बिगारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या प्रभाग; तसेच क्षेत्रीय कार्यालयात असल्या, तरी नगरसेवक किंवा साहेबांच्या वरदहस्तामुळे त्यांचा वावर दिवसभर मुख्यालयातच असतो. असे वृत्त लोकमत ने २३ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते़ त्याचा प्रत्यय गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाईत दिसून आला़ महापालिकेतील कोणतीही कामे करण्यासाठी ते इतरांच्या वतीने मांडवली करीत असल्याचे या कारवाईवरुन दिसून येत आहे़ 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग