शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

“पुणेकरांनी थोडा विचार करावा हे का घडवण्यात आले?, सत्ताधाऱ्यांनी…”; वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 09:39 IST

Vasant More Social Media Post News: पुणे मनपा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभराने वसंत मोरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

Vasant More Social Media Post News: विधानसभा, नगर पालिका अन् आता महापालिकांमध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ब्रँड दिग्विजयी असल्याचे सिद्ध केले. भाजपाने जवळपास ९ महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली असून २९ पैकी २४ महापालिकांवर भाजपा-शिंदेसेना युतीने वर्चस्व सिद्ध केले आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये मनसेतून उद्धवसेनेत गेलेल्या वसंत मोरे आणि त्यांच्या मुलाचाही समावेश होता. पुणे मनपा निवडणुकीनंतर आता वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून मनातील भावना व्यक्त केल्या.

पुणे मनपा निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक दिग्गजांमध्ये वसंत मोरे यांचाही समावेश आहे. मनसेमधून शिवसेना ठाकरे गटात गेलेले वसंत मोरे हे पुण्याच्या प्रभाग क्रमांक ३८ मधून निवडणुकीच्या मैदानात होते. भाजपाच्या संदीप बेलदरे यांनी वसंत मोरे यांचा पराभव केला. वसंत मोरेंसह त्यांचा मुलगा उद्धवसेनेतून निवडणूक लढवत होते. दोघांचाही मोठ्या फरकाने पराभव झाला. फायरब्रँड नेता म्हणून ओळख असलेल्या वसंत मोरेंना अशाप्रकारे पराभव पत्करावा लागल्यामुळे शहरात एकच चर्चा सुरू झाली.

पुणेकरांनी थोडा विचार करावा हे का घडवण्यात आले?

वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. यात वसंत मोरे म्हणतात की, पुणेकरांनी थोडा विचार करावा हे का घडवण्यात आले? याला कारण २०२२ ते २०२६ या कालावधीमधे राज्य सरकारने प्रशासनाला हाताशी धरून पुणे महानगरपालिकेत केलेला कारभार वेळोवेळी बाहेर काढला जाईल…या भीतीने पुणे महानगरपालिकेत प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्यात आले… हे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी केले… आबा बागुल माजी विरोधी पक्षनेता, दत्तात्रय धनकवडे माजी महापौर, सुभाष जगताप माजी सभागृहनेता, विशाल तांबे माजी स्थायी समिती चेअरमन, अश्विनी कदम माजी स्थायी समिती चेअरमन, वसंत मोरे माजी विरोधी पक्षनेता गटनेता, संजय भोसले माजी गटनेता, दिपाली धुमाळ माजी विरोधी पक्षनेता, साईनाथ बाबर माजी गटनेता, अशोक हरणावळ माजी गटनेता, शंकर केमसे माजी सभागृहनेता, किशोर शिंदे माजी गटनेता, बाबू वागसकर माजी गटनेता, अविनाश बागवे स्थायी समिती सभासद, नंदाताई लोणकर स्थायी समिती सभासद, योगेश ससाने स्थायी समिती सभासद, नाना भानगिरे स्थायी समिती सभासद, रूपाली पाटील शहर सुधारणा अध्यक्ष हे सर्वजण जर सभागृहात असते तर यांच्या चार वर्षाच्या पापाचा पाढा सतत बाहेर काढला असता…, असे वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, पुणे मनपा निकालानंतर जवळपास आठवड्याभराने वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली असून त्यामधून त्यांनी अनेक आरोप केले आहेत. पुणे महानगरपालिकेत प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी षडयंत्र केल्याचा आरोपही त्यांनी लावला आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Vasant More's post sparks debate: Pune municipal election analysis.

Web Summary : Vasant More's social media post alleges a conspiracy by ruling parties to defeat key corporators in Pune municipal elections. He claims this was to suppress exposure of past wrongdoings. Many experienced leaders faced defeat.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Corporationनगर पालिकाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Vasant Moreवसंत मोरेShiv Senaशिवसेना