शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

अपघात रोखण्यासाठी सरसावली पीएमपी!

By admin | Updated: March 24, 2015 00:23 IST

ब्रेक फेल, आॅईल गळती, अन्य तांत्रिक बिघाड तसेच बसचालकांच्या चुकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) सरसावले

पुणे : ब्रेक फेल, आॅईल गळती, अन्य तांत्रिक बिघाड तसेच बसचालकांच्या चुकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) सरसावले असून, विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच काही उपाययोजनांवर काम सुरू असून, त्या लवकरच प्रत्यक्षात आणल्या जातील.पीएमपी बसच्या विविध अपघातांमध्ये ७ जणांचा बळी गेला आहे. तसेच काही किरकोळ अपघातांमध्ये जखमी झालेल्यांची संख्याही जास्त आहे. तसेच कात्रज बसस्थानकात झालेल्या अपघातामुळे पीएमपीने मार्गावर आणलेल्या जुन्या बसेसमुळे प्रशासनावर टीका झाली. जुन्या बसेसमुळेच अपघात होत असल्याची ओरड सध्या होत आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी दुरुस्त केलेली प्रत्येक बस आरटीओच्या तपासणीनंतरच मार्गावर आणण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. अपघात रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना डॉ. परदेशी म्हणाले, प्रवाशांची धावपळ व गोंधळ रोखण्यासाठी कात्रज, स्वारगेट व मनपा बसस्थानकांवर स्पीकरद्वारे माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही दिवसांत इतर मुख्य स्थानकांवर ही सुविधा केली जाईल. सर्व चालकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बस आगारातून बाहेर पडण्यापूर्वीच ब्रेकसाठी एअरप्रेशर, हँडब्रेक तसेच अन्य प्राथमिक गोष्टी नीट असल्याची खात्री केली जाईल. चालकांवर नियंत्रणासाठी ‘चालक तपासणी पथक’ तयार करण्यात येईल. तिकीट तपासणिसाप्रमाणे हे पथक चालकांचे बसचालन कौशल्य, बसथांब्यावर थांबणे, बसचा वेग, ब्रेक, गिअरचा वापर या गोष्टींवर लक्ष ठेवेल. त्यानुसार चालकांचा स्वतंत्र अहवाल तयार करून संबंधितांना प्रशिक्षण किंवा इतर उपाययोजना केल्या जातील. दि. १९ ते २२ मार्च या कालावधीत सर्व बसेसची ब्रेक सिस्टीम तयार करण्यात आली आहे. त्यातील ५ बसमध्ये दोष आढळून आला असून, त्या मार्गावरून काढण्यात आल्या आहेत. सर्व बसेसची सर्व प्रकारची तपासणी करून घेणार आहे. गॅरेज व वर्कशॉप सुपरवायझर प्रत्येक बसची पडताळणी नोंद ठेवतील. चालकांच्या ट्रॅक रेकॉर्डनुसार त्यांना रिफ्रेशर कोर्स दिला जाईल. सर्व बसना मागे रिफ्लेक्टर बसविण्यात येतील, असे डॉ. परदेशी यांनी सांगितले.पुणे व पिंपरी चिंचवडमधील मोठ्या २० बसस्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘बस बे’ तयार केले जाणार आहेत. त्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिसांची मदत घेतली जाईल. बसस्थानकाभोवती बॅरिकेड्स लावून बस बे तयार केला जाईल. तसेच आसपासचे अतिक्रमणही हटविले जाईल. याबाबत वाहतूक उपायुक्तांशी चर्चा झाली असून, पुढील दोन आठवड्यांत कार्यवाही होईल, असे डॉ. श्रीकर परदेशी यांनी नमूद केले.आगार, बसस्थानकांचे ‘सेफ्टी आॅडिट’पुणे : पुणे व पिंपरी चिंचवडमधील सर्व १० आगार व प्रमुख १२ बसस्थानकांचे सेफ्टी आॅडिट करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंंडळाने (पीएमपी) घेतला आहे. कात्रज बसस्थानकात झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी सोमवारी दिली.कात्रज बसस्थानकात झालेल्या बस अपघातात दोघांचा बळी गेला होता. त्यानंतर पीएमपीने केलेल्या पाहणीत हा अपघात मानवी चुकीमुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. बसस्थानकाची भौगोलिक स्थितीही त्यास कारणीभूत असल्याचे पाहणीनंतर निदर्शनास आले. याचा उल्लेख करून डॉ. परदेशी म्हणाले, की कात्रज बसस्थानकासमोर उतार असल्याने दुर्दैवाने ब्रेक निकामी झाल्यास ती बस थेट उताराने खाली येऊ शकते. त्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही वरिष्ठ चालक तेथील बस वाहतुकीवर लक्ष देण्यासाठी नेमण्यात आले आहेत. आठवडाभरात वर्तुळाकार पद्धतीने बस पुढे जातील, जेणेकरून उताराच्या दिशेने त्या उभ्या राहणार नाहीत. तसेच बसस्थानकाच्या मागे असलेल्या जागेची महापालिकेकडे मागणी केली जाणार आहे. याअनुषंगाने पुणे व पिंपरी चिंचवडमधील सर्व १० आगार व प्रमुख १२ बसस्थानकांचे येत्या सोमवारपासून सेफ्टी आॅडिट केले जाणार आहे. त्यासाठी वर्कशॉप सल्लागारांच्या नेतृत्वाखाली तीन जणांची टीम नेमण्यात आली आहे. ही टीम सर्व आगार व १२ बसस्थानकांची पाहणी करेल. त्यांच्या भौगोलिक रचना, प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, त्यांची सुरक्षितता, बसवाहतूक अशा विविध बाबींचा अभ्यास केला जाईल. त्याचा अहवाल तयार करून त्यानुसार प्रत्यक्ष उपाययोजना केल्या जातील, असे डॉ. परदेशी यांनी स्पष्ट केले.... तर जूनपर्यंत धावेल बीआरटीनगर रस्ता, विश्रांतवाडी - आळंदी आणि औंध - रावेत या मार्गांवर बीआरटी प्रस्तावित आहे. या तीनही मार्गांवर आयटीएमएस सिस्टीम कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही सिस्टीम सुरू केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने या मार्गावर पालिकेला उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जूनपर्यंत बीआरटी सुरू होईल, अशी अपेक्षा असल्याचे डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले.