शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान पीकविमा योजना: शेतकऱ्यांच्या खात्यांवर उद्या जमा होणार ९२१ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 07:24 IST

खरीप, रब्बीतील रखडलेले दावे निकाली

पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेतील गेल्यावर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसानभरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. त्यात खरिपातील नुकसानभरपाई ८०९ कोटी, तर रब्बीतील ११२ कोटी रुपये असे एकूण ९२१ कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. 

यापूर्वी पीकविम्याची नुकसानभरपाई कंपन्यांकडून त्या-त्या वेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती; मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर सोमवारी प्रथमच नुकसानभरपाईचे वाटप होणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याचा शुभारंभ करतील. त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यात ‘डीबीटी’द्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाईल. 

राजस्थानमधील झुंझुनूत होणार मुख्य कार्यक्रम

केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आता ही एकूण ९२१ कोटी रुपयांची नुकसानभरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘डीबीटी’ने जमा केली जाणार आहे. 

नुकसानभरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुनू येथे होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.    

निकष कठोर केल्याने चांगल्या भरपाईची आशा.... 

नुकसानभरपाईचे निकषही कठोर केल्याने शेतकऱ्यांना चांगली नुकसानभरपाई मिळाली.या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचीही नुकसानभरपाई प्रलंबित होती. राज्य सरकारने १ हजार २८ कोटी रुपयांचा हा हप्ता १३ जुलै रोजी कंपन्यांकडे जमा केला.

त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या हंगामात ९५ लाख ६५ हजार अर्जदार शेतकऱ्यांना ४ हजार ३९७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार होती. त्यापैकी ८० लाख ४० हजार शेतकऱ्यांना ३ हजार ५८८ कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप करण्यात आले होते. तर १५ लाख २५ हजार शेतकऱ्यांना ८०९ कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप झालेले नव्हते.