पुणे : नॅशनल अॅसेसमेन्ट अँड अक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक) तर्फे बुधवारी मूल्यांकनाचा निकाल जाहीर करण्यात आला असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नॅककडून ‘ए प्लस’ ग्रेड मिळाला आहे. राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत सर्वाधिक ग्रेड घेऊन पुणे विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावले असून, विद्यापीठाचा क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट अॅव्हरेज (सीजीपीए) ३.६० आहे.नॅक समितीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भेट दिली होती. बुधवारी सायंकाळी ‘नॅक’च्या संकेतस्थळावर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयांच्या मूल्यांकनाचा निकाल जाहीर करण्यात आला. मूल्यांकनाच्या तिसऱ्या फेरीमध्ये विद्यापीठाला ‘ए प्लस’ हा दर्जा प्राप्त झाला आहे़सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या मूल्यांकनाचा निकाल प्रसिद्ध झाला आहे. त्याचप्रमाणे बीड, जळगाव, परभणी, मुंबई, रत्नागिरी आदी ठिकाणच्या महाविद्यालयांचे मूल्यांकनाचे निकालही जाहीर झाले आहेत. विद्यापीठाचे माजी बीसीयुडी डॉ. व्ही. गायकवाड म्हणाले, की राज्यात सर्वाधिक ग्रेड घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अव्वल क्रमांकावर आले आहे. अध्ययन, अध्यापन आणि संशोधनामध्ये विद्यापीठाने मोठी कामगिरी केली आहे. विद्यापीठाच्या नवनवीन उपक्रमांची, परदेशी विद्यापीठ व औद्योगिक कंपन्यांशी असलेल्या करारांची दखल घेतली.
पुणे विद्यापीठाला ‘नॅक’कडून ए प्लस ग्रेड
By admin | Updated: February 23, 2017 03:45 IST