शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टीक बंदी ! व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवा अन् 501 मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 13:40 IST

'एखाद्या वार्डात कचरा उचलला जात नसेल तर त्याचा फोटो सरपंचांच्या व्हाट्सअॅपवर पाठवा आणि 501 रुपयांचे बक्षीस मिळवा,' असे आवाहन सरपंच जीवन खराबी यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या ग्रामसभेत केले.

पुणे (चाकण) : 'एखाद्या वार्डात कचरा उचलला जात नसेल तर त्याचा फोटो सरपंचांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवा आणि 501 रुपयांचे बक्षीस मिळवा,' असे आवाहन सरपंच जीवन खराबी यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या ग्रामसभेत केले. प्लास्टीक बंदी निर्णयानंतर परिसरातील गावांनी कठोर निर्णय घेतले आहेत. खराबवाडी (ता.खेड) येथील ग्रामपंचायतीकडून प्लास्टीकचा वापर टाळणे, महिलांना कापडी पिशव्यांचे प्रशिक्षण देणे व क्रांती महिला बचत गटास स्वस्त धान्य परवानासाठी परवानगी देणे आदी विषय सरपंच जीवन खराबी यांच्या अध्यक्षतेखालील महिलांच्या विशेष सभेत घेण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या ठरावास महिलांनी हात वर करून एकमुखाने मंजुरी दिली. तसेच यापुढे प्लास्टीक वापरणार नसून प्रत्येक महिला आपल्या घरापासून त्याची सुरुवात करेल, असे आश्वासनही दिले. तर महिलांनी आपापल्या वार्डातील समस्याही सभेत मांडल्या. त्यानंतर, सरपंचांनी या समस्या सोडविण्याचे आश्वासन देत कर्मचाऱ्यांना त्वरित  सूचना दिल्या. 

खराबवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सभेत सरपंच जीवन खराबी यांनी मनोगत व्यक्त केले. 'आम्ही पदभार स्वीकारण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा पहिला उपक्रम हाती घेतला. ग्रामपंचायतचा कर्मचारी हा ग्रामपंचायतीचा आत्मा आहे. जो कर्मचारी काम करण्यास टाळाटाळ करील किंवा कामचुकारपणा करील त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. कर्मचारी दिवसभरात जे काम करतील त्याची नोंद ग्रामपंचायत ठेवणार आहे. सफाई कामगारांनी वार्डात साफसफाई करून कचरा उचलल्यानंतर त्या वार्डातील वार्ड सदस्य किंवा जबाबदार व्यक्तीची सही घेण्याचे त्यांना बजावले आहे. तसेच कर्मचाऱ्याने सही न घेतल्यास, कर्मचाऱ्याचा त्या दिवसाचा पगार कपात करण्यात येणार आहे. सफाई कामगार कचरा उचलत नसेल तर नागरिकांनी आपापल्या वार्ड सदस्याकडे तक्रार करावी. अथवा कचऱ्याचे फोटो आमच्या व्हॉट्सअॅपवर पाठवावेत. या कचऱ्याचा फोटो पाठविणाऱ्या महिलेस 501 रुपयांचे रोख बक्षीस ग्रामपंचायतीच्यावतीने दिले जाईल, असे सरपंच खराबी यांनी ग्रामसभेत बोलताना सांगितले. तसेच 'गाव तंटामुक्त राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. गावातील तंटे गावातच सोडवू, वेळप्रसंगी तंटा करणाऱ्यांचे पाय धरू, त्यासाठी मी सरपंच म्हणून 24 तास आपल्या सेवेसाठी तत्पर आहे,'' असेही खराबी यांनी म्हटले. याप्रसंगी गावातील सर्व महिलांच्यावतीने उद्योजक अरुण जांभुळकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचाचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या शिस्तीच्या बाबतीत कडक भूमिका घेतल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीsarpanchसरपंचWhatsAppव्हॉट्सअॅप