शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

नगर परिषदांकडून प्लॅस्टिक कारवाईत दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 02:32 IST

पुणे जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण आणण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कारवाईवर भर देण्यात येत असला, तरी नगर परिषदांकडून मात्र प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण आणण्याच्या कारवाईत हलगर्जीपणा केला जात असल्याचे चित्र आहे.

पुणे : जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण आणण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कारवाईवर भर देण्यात येत असला, तरी नगर परिषदांकडून मात्र प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण आणण्याच्या कारवाईत हलगर्जीपणा केला जात असल्याचे चित्र आहे. गेल्या ८ महिन्यांमध्ये जिल्ह्यामधून प्रशासनाने अवघ्या २ हजार २२० किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. तर, ५८ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.सर्वाधिक कारवाई अनुक्रमे सासवड, तळेगाव दाभाडे, बारामती आणि लोणावळा नगर परिषदेमध्ये करण्यात आल्या आहेत. तर, सर्वांत कमी कारवाई जेजुरी, दौंड, इंदापूर, भोर, आळंदी, जुन्नर, राजगुरुनगर, चाकण या नगर परिषदांमध्ये झालेल्या आहेत. ही कारवाई वाढविण्याची आवश्यकता असून या नगर परिषदांचे प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावरील कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. या नगरपालिकांनी कारवाई केलेल्या व्यक्ती आणि वसूल केलेला दंड निरंक आहे.प्लॅस्टिक पिशव्यांना कापडी आणि कागदी पिशव्यांचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, किमती जास्त असल्याने वापर कमी आहे. त्यामुळे या पिशव्यांच्या किमती कमी झाल्यास नागरिकांमधून त्याचा वापर वाढण्यास मदत मिळणार आहे. स्थानिक नगर परिषदांनी प्लॅस्टिक मुक्तीसाठी पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण आणणे आवश्यक असून कारवाई वाढविणे गरजेचे आहे.राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी नुकतीच पुण्यात विधान भवनामध्ये या संदर्भात एक बैठक घेऊन आढावा घेतला.सध्या राज्यामध्ये संपूर्ण प्लॅस्टिक बंदी करण्याच्या हालचाली सुरु आहेत. शासनस्तरावर कायदा तयार करण्याचे काम सुरू असून येत्या गुढी पाडव्यापासून प्लॅस्टिक बंदी लागू होण्याची शक्यता आहे.या वेळी विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. या सर्वांनी आतापर्यंत केलेल्या उपाययोजना, कारवाईचा आढावा घेत सूचना मागविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणे